देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. एनडीचे उमेदवार जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) व युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांच्यामध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी लढत होत आहे. खासदार, आमदार या निवडणुकीत आज मतदान ( MP MLA Will Vote ) करतील. संसदेतील सदस्यांचे बलाबल पाहता भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय सहज मानला जात आहे.
एनडीचे उमेदवार जगदीप धनखड - राजस्थानमधून आलेले जगदीप धनखड हे सत्ताधारी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) उमेदवार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांचे राजकीय कार्यक्षेत्र राजस्थान असून ते झुंझुनूचे रहिवासी आहेत. लोकसभा आणि राज्यसभेचे अध्यक्ष राजस्थानमधून येण्याची ही पहिलीच वेळ असेल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथून खासदार आहेत. तर राज्यसभेत सभापती हे उपराष्ट्रपती असतात.