न्यूयॉर्क Vehicle Explosion at US Canada Border :बुधवारी (22 नोव्हेंबर) दुपारी नायगारा फॉल्सजवळ यूएस-कॅनडा सीमा क्रॉसिंगवर झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. तसंच या घटनेनंतर परिसरातील चार यूएस-कॅनडा सीमा क्रॉसिंग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, या संदर्भात अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनूसार, मृत व्यक्तींचे राष्ट्रीयत्व अद्याप समजू शकलेलं नाही. कार अमेरिकेतून येत असताना कार कस्टम स्टेशनला धडकली आणि त्यानंतर आग लागली.
प्रत्यक्षदर्शीची प्रतिक्रिया : न्यूयॉर्कमधील कॅनेडियन पर्यटक माईक गुएंथरनं सांगितलं की, ही घटना घडली तेव्हा मी तेथनूच जात होतो. यावेळी सीमा ओलांडण्याच्या दिशेनं वाहन वेगानं जात असल्याचं दिसलं. वाहनाचा वेग 100 mph पेक्षा जास्त असावा. कार कस्टम स्टेशनला आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यानंतर सगळीकडे फक्त धूर होता. दरम्यान, FBI बफेलो फील्ड ऑफिस या तपासणीमध्ये आमच्या स्थानिक, राज्य आणि फेडरल कायद्याची अंमलबजावणी भागीदारांशी समन्वय साधत आहे.
न्यूयॉर्कच्या गव्हर्नर काय म्हणाल्या :नायगारा फॉल्स, ओंटारियो, कॅनडा आणि नायगारा फॉल्स, न्यूयॉर्क यांना जोडणारा रेनबो पूल हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. लुईस्टन-क्वीन्स्टन ब्रिज, व्हर्लपूल रॅपिड्स ब्रिज आणि पीस ब्रिज हे या भागातील इतर सीमा क्रॉसिंग आहेत. या घटनेनंतर, न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कैथी होचुल यांनी एका निवेदनात म्हटलंय की, माझ्या निर्देशानुसार, न्यूयॉर्क राज्य पोलीस न्यूयॉर्कमध्ये प्रवेश करण्याच्या सर्व ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी एफबीआय संयुक्त दहशतवाद टास्क फोर्ससोबत सक्रियपणे काम करत आहेत.
रेनबो ब्रिज क्रॉसिंग बंद :पुढं त्या म्हणाल्या की, सध्या त्या आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांना भेटण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बफेलोला जात आहे. तसंच, नायगारा फॉल्सजवळ अमेरिका आणि कॅनडाला जोडणार्या रेनबो ब्रिजची क्रॉसिंग बंद ठेवण्यात आली आहे. तसंच या ठिकाणी न्यूयॉर्क, बफेलो येथील फेडरल अधिकार्यांनी तपास सुरू केला असल्याचंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -
- Bollywood in Mini Niagara: 'मिनी नायगारा' समजल्या जाणाऱ्या चित्रकोट धबधब्यात होतेय वेब सीरिजचे शूटिंग..
- New York : भारतीय वंशाच्या नागरिकांनी अनोखे जॅकेट परिधान करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले जंगी स्वागत
- Musk lifts suspension of twitter accounts : एलॉन मस्कने 'यामुळे' पत्रकारांची निलंबित ट्विटर खाती पुन्हा केली सुरू