शिवमोग्गा कर्नाटक शहरातील Shivamogga of karnataka अमीर अहमद सर्कल येथे लावलेला वीर सावरकर यांचा फ्लेक्स काही युवकांनी काढून टाकल्याची Veer Savarkar Flex vacated घटना आज घडली आहे. फ्लेक्स काढून त्याची विटंबना करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी शहरात कलम 144 लागू करण्यात आले Section 144 enforced in Shivamogga आहे.
स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त शिवमोगा येथील अमीर अहमद सर्कल सजवण्यात आले असून तेथे वीर सावरकर यांचा फ्लेक्सही लावण्यात आला आहे. मात्र काही तरुणांनी तो फ्लेक्स फाडून काढून टाकला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी हलका लाठीचार्ज केला.
या घटनेचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांनी बैठक घेत निषेध केला. त्यानंतर कार्यकर्ते पुन्हा फ्लेक्स लावण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना रोखले आणि शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी चार ते पाच जणांना पोलिसांनी पकडून नेले. अमीर अहमद सर्कलमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. शहरातील गांधी बाजार आणि नेहरू रोडवरील दुकाने बंद ठेवण्यात आली असून संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.