महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Veer Savarkar Death Anniversary : यंदा वीर सावरकर यांची 57वीं पुण्यतिथी, जाणून घेऊया सविस्तर - वीर सावरकर यांची 57वीं पुण्यतिथी

विनायक दामोदर सावरकर हे वीर सावरकर म्हणून देखील ओळखले जातात. विनायक दामोदर सावरकर हे प्रखर हिंदू विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, वकिल, तत्त्वज्ञ, स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, आणि भाषाकारही होते. 26 फेब्रुवारी रोजी त्यांची 57वीं पुण्यतिथी आहे.

Veer Savarkar Death Anniversary
सावरकर यांची 57वीं पुण्यतिथी

By

Published : Feb 10, 2023, 1:56 PM IST

Updated : Feb 25, 2023, 9:08 PM IST

विनायक दामोदर सावरकर हे भारताचे महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक, इतिहासकार, नेते आणि विचारवंत होते. त्यांना अनेकदा स्वातंत्र्यवीर आणि वीर सावरकर असे संबोधले जाते. हिंदू राष्ट्रवादाची राजकीय हिंदुत्व विचारधारा विकसित करण्याचे मोठे श्रेय सावरकरांना जाते. ते वकील, राजकारणी, कवी, लेखक आणि नाटककार देखील होते. धर्मांतरित हिंदूंना हिंदू धर्मात परत आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यासाठी आंदोलने केली. भारताची सामूहिक 'हिंदू' ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी 'हिंदुत्व हा शब्द तयार केला. त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानात उपयुक्ततावाद, बुद्धिवाद, सकारात्मकतावाद, मानवतावाद, वैश्विकतावाद, व्यावहारिकता आणि वास्तववाद हे घटक होते. सावरकर हे सर्व धर्मांच्या सनातनी श्रद्धांना विरोध करणारे कट्टर बुद्धिवादी होते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी त्यांची 57वीं पुण्यतिथी आहे.

सावरकरांचे बालपण : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर तरत्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत होते, ते गावातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. सावरकर ९ वर्षांचे असताना त्यांची आई वारली. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यांनी लहानपणी काही कविताही लिहिल्या. 1901 मध्ये त्यांनी नाशिकच्या शिवाजी हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. स्वातंत्र्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी एक गुप्त समाज स्थापन केला, जो 'मित्र मेळा' म्हणून ओळखला जाऊ लागला. 1905 च्या फाळणीनंतर त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असतानाही ते देशभक्तीने भरलेली दमदार भाषणे देत असे.

हिंदुत्वाचे पुरस्कर्ते : 1909 मध्ये लिहिलेल्या 'The Indian War of Independence-1857' या पुस्तकात सावरकरांनी हा लढा ब्रिटिश सरकारविरुद्धचा पहिला स्वातंत्र्ययुद्ध म्हणून घोषित केला आहे. वीर सावरकर 1911 ते 1921 पर्यंत अंदमान तुरुंगात राहिले. 1921 मध्ये ते मायदेशी परतले आणि त्यानंतर तीन वर्षे तुरुंगात घालवली. तुरुंगात ‘हिंदुत्व’ या विषयावर संशोधनात्मक पुस्तक लिहिले. 1937 मध्ये त्यांची हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1943 नंतर ते दादर, मुंबई येथे राहिले. 9 ऑक्टोबर 1942 रोजी भारताच्या स्वातंत्र्यासाठी चर्चिल यांना समुद्री तार पाठवला आणि ते आयुष्यभर अखंड भारताच्या बाजूने उभे राहिले. स्वातंत्र्याच्या साधनांबद्दल गांधीजी आणि सावरकरांचे मत भिन्न होते.

कसे मिळाले 'स्वातंत्र्यवीर' हे नाव : सावरकर तुरुंगात असताना त्यांनी १८५७ च्या क्रांतीवर आधारित '१८५७ चे स्वातंत्र्य समर' हा सविस्तर मराठी ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ खूप गाजला आणि अत्रे यांनी सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ असे नाव दिले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद किना-यावर लिहिलेल्या 'ने मजसी ने परतमातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..' या काव्याला १० डिसेंबरला 2023 रोजी 114 वर्षे पूर्ण झाली. २७ मे १९३८ रोजी 'मराठा' या वृत्तपत्रात हे काव्य प्रसिद्ध झाले. भा. द. खेर यांनी लिहिलेल्या सावरकरचरित्रात तात्यारावांनी १० डिसेंबर १९०९ रोजी हे काव्य लिहिल्याचा उल्लेख केला आहे.

इच्छामरणाचे समर्थक सावरकर :सावरकरांनी मृत्यूच्या दोन वर्षे आधी 1964 मध्ये 'आत्महत्या किंवा आत्मसमर्पण' हा लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी इच्छामरणाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. याबाबत ते म्हणाले की, आत्महत्या आणि आत्मत्याग यात महत्त्वाचा फरक आहे. प्रखर राष्ट्रवादी आणि स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांचा मृत्यू कसा झाला, हे प्रश्न अनेकदा विचारले गेले आहेत. सामान्यतः असे मानले जाते की, त्यांनी स्वत: साठी इच्छामरणाची अवस्था निवडली होती. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले. त्यापूर्वी महिनाभर त्यांनी उपोषण सुरू केले होते. असे मानले जाते की, या व्रतामुळे त्यांचे शरीर अशक्त झाले आणि त्यानंतर वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. किंबहुना काळ्यापाण्याच्या शिक्षेचा त्यांच्या तब्येतीवर खोलवर परिणाम झाला.

हेही वाचा : Vasudev Balwant Phadke Death Anniversary : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांच्या जीवनाविषयीच्या महत्वाच्या गोष्टी

Last Updated : Feb 25, 2023, 9:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details