लखनौ - भाजप नेते वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाच्या योगी सरकारवर निशाणा साधला आहे. लखीमपूर खेरीमधील घटनेचा खासदार वरुण गांधी यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की उत्तर प्रदेशचे शेतकरी समोध सिंह गे गेल्या 15 दिवसांपासून धान्य विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फिरत आहेत. मात्र, त्यांच्या धान्याची विक्री झाली नाही. तेव्हा त्यांनी नैराश्याने स्वत: धान्याला आग लावली आहे.
खासदार वरुण गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांवर अशी वेळ आली आहे. कृषी धोरणाबाबत पुनर्चिंतन करण्याची सर्वाधिक गरज असल्याचे खासदार गांधी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ; केंद्राच्या तिजोरीवर 9488.75 कोटींचा पडणार बोझा
लखीमपूर खिरी येथे काय घडली घटना?
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी धान्य विक्रीसाठी गेला होता. मात्र, धान्याची विक्री झाली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने पेट्रोल टाकून धान्याला आग लावली. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मोहम्मदी बरखेडाचे माजी सरपंच समोद सिंह आणि प्रमोद सिंह यांचा आहे.
हेही वाचा-आरएसएसची मते फक्त उजवी नाही तर काही डाव्या विचारसरणीसारखी - दत्तात्रय होसाबळे
आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांची शिफारसही नाही आली कामी-
समोद सिंह हे बरखेडा गावाचे माजी सरपंच आहे. ते भाजपचे खासदार प्रताप सिंह यांचे समर्थक आहेत. समोद सिंह यांच्या माहितीनुसार ते 12 ऑक्टोबरला 250 क्विंटल धान्य घेऊन मोहम्मद बाजार समितीमध्ये पोहोचले. तेव्हापासून बाजार समितीमध्ये धान्य पडून होते. 19 ऑक्टोबरनंतर 3 दिवस पावसापासून धान्याचे संरक्षण करण्यासाठी त्यावर ताडपत्री टाकली होती. मात्र, पावसात थोडे धान्य भिजल्याने आडते एजंटनी धान्य खरेदी करण्यास नकार दिला. त्यानंतर दोन दिवस धान्य वाळवून आणल्यानंतरही आडत्यांनी धान्य खरेदी करण्यास नकार दिला. आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी शिफारस करूनही कुणीही धान्य खरेदी केली नाही. धान्य विक्रीसाठी सरकारकडून सुरू केलेल्या ऑनलाईन पोर्टलवरही नोंदणी करण्यात आली होती. शेवटी शेतकऱ्याजवळ केवळ 100 रुपये राहिले होते. याच पैशाचे पेट्रोल विकत घेऊन त्यांनी धान्याच्या ढिगाऱ्याला आग लावली.
हेही वाचा-अमरिंदर सिंग यांच्या मैत्रिणीवरून पंजाबमध्ये घमासान; कोण आहे अरुसा आलम?
वरुण गांधी व भाजपमध्ये संबंध चांगले नसल्याचा अंदाज
नुकतेच खासदार वरुण गांधी यांना राज्य व केंद्र सरकारविरोधात मत व्यक्त केले होते. भाजपचे खासदार असूनही त्यांनी सातत्याने भाजप सरकारविरोधात मत व्यक्त केले आहे. त्याचा परिणाम म्हणून त्यांना व त्यांची आई मेनका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. वरुण गांधींनी पुन्हा एकदा योगी सरकारवर टीका करणारे ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामधून वरुण गांधी आणि भाजपमधील संबंध चांगले नसल्याचे स्पष्ट होत आहे.