मुंबई - केंद्र सरकारने विविध सरकारी उपक्रम आणि बँकांच्या खासगीकरणाचा धडाकाच लावला आहे. त्यावरून विरोधकांसह सर्वच पातळ्यांवर टीका होत असली तरी केंद्रातील सत्ताधारी त्यावर सोयिस्कर मौन बाळगून आहेत. (Samana Editorial On Varun Gandhi) बोलायचेही नाही आणि जे करायचे आहे ते सोडायचेदेखील नाही, (Gandhi Criticism of BJP from above) असेच एकंदरीत केंद्र सरकारचे (BJP MP Varun Gandhi Slams Govt Bank Privatisation) खासगीकरणाबाबतचे धोरण आहे. मात्र, आता भाजपचेच एक खासदार वरुण गांधी यांनीही त्यावरूनच स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. सरकारचे खासगीकरणाचे आणि ई-कॉमर्सचे धोरण देशविरोधी असून खासगीकरणामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत, असे वरुण गांधी म्हणाले.
अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली
उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्राच्या धोरणावर सडकून टीका केली. 'केंद्र सरकार खासगीकरणाच्या नावावर सगळेच विकून टाकत आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या रोजगारावर तर गदा आलीच आहे. परंतु, अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली आहे,' असे वरुण गांधी म्हणाले. (Govt Bank Privatisation सरकारी नोकऱ्या देण्याऐवजी आहेत त्या काढून घेण्याचे उफराटे धोरण सध्या राबविले जात आहे, असेही ते म्हणाले. वरुण गांधी हे नेहरू-गांधी परिवारातील असले तरी ते भाजपचे खासदार आहेत. त्यांच्या आई मनेका गांधी यादेखील बरीच वर्षे भाजपच्याच खासदार राहिल्या आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. त्यामुळे वरुण गांधी यांची टीका त्यांच्या पक्षधुरिणांना झोंबणारी नक्कीच आहे.
निराकरण करण्याऐवजी त्यांना राष्ट्रद्रोही, पक्षद्रोही म्हणत दुर्लक्ष करायचे
राहुल गांधी यांची टीका 'राजकीय' वगैरे असल्याची बतावणी भाजपवाले नेहमीच करीत असतात. मग आता त्यांच्याच पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केलेल्या टीकेबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे? अर्थात, त्यावरही वरुण गांधी सध्या 'नाराज' वगैरे आहेत. त्या वैफल्यातून ते स्वपक्ष आणि सरकारवर टीका करीत आहेत, अशी मखलाशी भाजपची मंडळी करतील. मागील काही दिवसांतील बातम्यांवरून चित्र जरी तसे दिसत असले तरी वरुण गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे, मुद्द्यांचे काय? पक्षाचे धोरण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे काही ठरले असेल तर तो भाजपचा पक्षांतर्गत मामला आहे. त्यावर कोणी काही टिकाटिप्पणी करण्याचे कारण नाही.
सोयिस्कर मौन बाळगायचे असे धोरण सध्या केंद्रातील सरकारचे आहे