चेन्नई- केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद बोलणे हे कधीही स्वीकारले जाणार नसल्याचे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले. त्या तिरुनेलवेलीमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
टीएमएमकेच्या नेते जनपदियानचे पुत्र वायनको पानदियान यांच्या विवाह समारंभाला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तिरुनलवेलीमध्ये हजेरी लावली. विवाह समारंभानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन जंक्शनममध्ये आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद बोलणे हे स्वीकारले जाणार नाही. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविरोधात अनादराने बोलणे ही आमची संस्कृती नाही.
हेही वाचा-OBC आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका - देवेंद्र फडणवीस
ग्रामीण भागात 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याने तशी विधाने करू नयेत. महाराष्ट्राचा कायदा वैशिष्ट्यपूर्ण आहे. (नारायण राणे प्रकरणाचा) पोलीस तपास करत आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शाळा उघडल्या आहेत. कोरोना संसर्गावर अटकाव करण्यासाठी पावले उचलण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरामध्ये शाळा उघडण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.