महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Birthday : पंतप्रधान मोदींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, देशभर विविध कार्यक्रम - सुदर्शन पटनाईक यांनी बनवले पीएम मोदींचे शिल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांचा आज 72 वा वाढदिवस ( pm modi birthday ) आहे. त्यानिमित्ताने देशविदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ( greetings from all over country ) होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu ) यांनी सकाळीच पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

pm modi birthday overall
pm modi birthday overall

By

Published : Sep 17, 2022, 1:01 PM IST

Updated : Sep 17, 2022, 2:09 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांचा आज वाढदिवस ( pm modi birthday ) आहे. त्यानिमित्ताने देशविदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सकाळीच पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्यांना सोडण्यात आले. नामिबियातून हे 8 चित्ते विशेष विमानाने आणले आहेत.

राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा -राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu ) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी अतुलनीय परिश्रम, समर्पण आणि सर्जनशीलतेने राबविलेली राष्ट्रनिर्माण मोहीम त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर राहो, अशी राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही अतुलनीय परिश्रम, समर्पण आणि सर्जनशीलतेने राबवत असलेली राष्ट्रनिर्माण मोहीम तुमच्या नेतृत्वाखाली अशीच प्रगती करत राहो. देव तुम्हाला आशीर्वाद देवो अशी माझी इच्छा आहे. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासह लाभो, असे ट्विट राष्ट्रपती भवनाने केले आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले 8 चित्ते

कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले 8 चित्ते -पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नामिबियातून एकूण 8 चित्ते, ज्यामध्ये 5 मादी आणि 3 नर आले आहेत. नामिबियाहून चित्त्यांना घेऊन जाणारे विशेष मालवाहू विमान शनिवारी सकाळी ग्वाल्हेरला पोहोचले. येथे केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी नवीन पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर चिनूक हेलिकॉप्टरद्वारे चित्त्यांना ग्वाल्हेरहून कुनो येथे पाठवण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांचे तिथे आगमन झाले. त्यांनी ग्वाल्हेरमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्त्यांना सोडले ( Kuno National Park ). 8 चित्ते देशात आणल्यामुळे कुनो नॅशनल पार्कसह संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.

वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी बनविले पंतप्रधान मोदी यांचे शिल्प

वाळू शिल्पकाराकडून अनोख्या शुभेच्छा - पुरी येथीलप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ( Padmashri Sudarshan Wishing PM Modi ) त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोदींची कलाकृती तयार केली आहे. त्यांनी ओडिशाच्या पुरी बीचवर १२१३ मातीचे चहा कप बसवून पाच फूट वाळूचे शिल्प तयार केले आहे. पटनायक यांनी 1213 मातीच्या चहाचे कप बसवून 'हॅपी बर्थडे मोदी जी' असा ( Sudarshan Patnaik Created Sculpture of PM Modi ) संदेश लिहिला आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींचा 5 फूट उंच वाळूचा पुतळा बनवण्यात आला आहे. या शिल्पासाठी त्यांनी सुमारे पाच टन वाळू वापरली. पटनायक यांनी पीएम मोदींच्या प्रत्येक वाढदिवसाला वाळूची वेगवेगळी शिल्पे बनवली आहेत. सुदर्शन म्हणाले, 'आम्ही हे मातीचे चहाचे ग्लास पीएम मोदींचा चहा विक्रेता ते देशाचे पंतप्रधान असा प्रवास दाखवण्यासाठी वापरले आहेत. येथे मी माझ्या कलेच्या माध्यमातून पंतप्रधानांना शुभेच्छा देतो. पद्मश्री सुदर्शन यांनी जगभरातील 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळू कला स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे. देशासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तुंचा लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार

भेटवस्तुंचा लिलाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime Minister Narendra Modi ) यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने शनिवारी पंतप्रधान मोदींना मिळालेल्या प्रतिष्ठित आणि संस्मरणीय भेटवस्तूंचा ई लिलाव सुरू केला आहे. आजपासून सुरू होणारा ई लिलाव ही त्याची चौथी आवृत्ती असून ती दोन आठवडे चालेल आणि 2 ऑक्टोबर रोजी संपेल. ( e auction of 1200 mementos gifts presented to modi ) केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. नोंदणी करण्यासाठी आणि लिलावात सहभागी होण्यासाठी https://pmmementos.gov.in वर जावे लागेल. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या विशेष भेटवस्तू आहेत. त्या सूचीबद्ध आहेत, असे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी ट्विट केले.

Last Updated : Sep 17, 2022, 2:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details