वाराणसी Varanasi Street Dog Reaches Abroad : धर्म आणि अध्यात्माची नगरी असलेल्या काशीच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या दोन मादी कुत्र्यांचं नशीब बदललंय. वाराणसीच्या गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या दोन भटक्या कुत्र्यांना विदेशात जाण्याची संधी मिळालीय. इतकंच नाही तर त्यांना परदेशात नेण्यासाठी त्यांचे पासपोर्टही तयार करण्यात आले आहेत. जया आणि मोती अशी या दोन कुत्र्यांची नावं आहेत. यातील मोती आधीच परदेशात गेला आहे. नेदरलँडहून मिरल ही तरुणी जयाला घ्यायला काशी इथं आली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयाला फीट टू फ्लायचं प्रमाणपत्र मिळालं आहे.
फीट टू फ्लाय सर्टिफिकेट सापडलं : वाराणसीच्या रस्त्यावर विदेशी नागरिकांना जया आणि मोती या मादी कुत्र्या सापडल्या होत्या. दोघांची परिस्थिती अशी होती की त्यांना कोणीही त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकत नव्हतं, पण दोघांचं नशीब असं चमकलं की, आता कुत्रे परदेशात राहायला जाणार आहेत. मोतीला त्यांनी आधीच परदेशात घेऊन गेले आहेत. यांनतर आता तब्बल 6 महिन्यांनंतर जयालाही वाराणसीबाहेर जाण्याची संधी मिळालीय. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयाला 'फीट टू फ्लाय' प्रमाणपत्र मिळालंय. यानंतर आता जया काशीहून नेदरलँडला रवाना होणार आहे. त्यासाठी नेदरलँडची रहिवासी मीरल स्वतः वाराणशीला पोहोचली आहे. जया ही श्वान 31 ऑक्टोबरला नेदरलँडच्या अॅमस्टरडॅमला जाणार आहे.
- जयाचं सर्व प्रकारचं लसीकरण : एनीमोटेल केअर ट्रस्टचे सीईओ संदीप सेन यांनी सांगितलं की, जयाला शोधून तिची सुटका करण्यात आली. सर्वप्रथम आम्ही जयाचं सर्व लसीकरण करून घेतलं. सेव्हन इन वन, अँटी रेबीज, जंतनाशक आणि मायक्रोचिपची प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर जयाचं ब्लड सीरम मीरलच्या देशात पाठवण्यात आलं, जेणेकरून तेथून जयाला रेबीजची लक्षणं नसल्याची खात्री केली.