महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Vande Bharat Express Security : दगडफेकीच्या घटनांनंतर वंदे भारत एक्सप्रेसची सुरक्षा वाढवली - वंदे भारतच्या सुरक्षेची जबाबदारी

आरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी वंदे भारत ट्रेनमध्ये दोन अधिकारी आणि तीन ते चार सशस्त्र कॉन्स्टेबल देण्यात आले होते. दगडफेकीच्या घटनेनंतर (stone pelting on Vande Bharat Express) ट्रेनमध्ये तीन अधिकारी आणि सहा ते सात सशस्त्र कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते. ट्रेनमध्ये तीन रेल्वे पोलीस कर्मचारीही असतील. (Vande Bharat Express Security increases).

Vande Bharat Express Security
वंदे भारत एक्स्प्रेस सुरक्षा

By

Published : Jan 4, 2023, 5:38 PM IST

सिलीगुडी (प. बंगाल) : भारतातील सर्वात वेगवान ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिस आणि रेल्वे मंत्रालय अतिरिक्त खबरदारी घेत आहेत. (Vande Bharat Express Security increases). विशेष म्हणजे ही ट्रेन सुरू झाल्यापासून ती अनेकदा दुर्व्यवहाराची शिकार बनली आहे. रेल्वेची सुरक्षा वाढवण्यासाठी बुधवारी आरपीएफ आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकावर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी आरपीएफ सोबत रेल्वे पोलीस देखील वंदे भारतच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. (stone pelting on Vande Bharat Express).

देखरेखीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार : रेल्वे पोलिसांनी कडक देखरेखीसाठी झोन आधारित व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे रेल्वे पोलिस प्रत्येक स्थानकावर प्रवेशापासून बाहेर पडण्यापर्यंत लक्ष ठेवतील. याशिवाय गेल्या दोन दिवसांत झालेल्या हल्ल्यांच्या तपासात सहकार्य करण्याची विनंतीही रेल्वे अधिकाऱ्यांनी राज्य सरकार, पोलिस, गुप्तचर विभाग आणि रेल्वे पोलिसांना केली आहे.

दगडफेकीच्या घटनेची सीआयडी चौकशीची मागणी : केंद्रीय गृह राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी यापूर्वीच वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. "आम्ही रेल्वे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही पाळत ठेवणार आहोत. त्यांचे ट्रेन स्टेशनमध्ये प्रवेश केल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत फोटो ग्रुपमध्ये सामायिक केली जाईल. ग्रुपमध्ये IC, OC सह सर्व पोलिस कर्मचारी असतील", असे ते म्हणाले.

वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना : आतापासून ट्रेनमध्ये एक अधिकारी आणि दोन कॉन्स्टेबल ठेवले जातील. NJP ते हावडा रेल्वे पोलीस देखील असतील", असे रेल्वे पोलीस अधीक्षक एस सेल्वामुरुगन यांनी बैठकीनंतर सांगितले. ते म्हणाले, "आम्हाला कुमारगंज घटनेचा तपास आरपीएफकडे सोपवण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांकडे अनेक पायाभूत सुविधा आहेत ज्यामुळे तपासाला गती मिळेल." ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे म्हणाले, "रेल्वेने तक्रार दाखल केली आहे. राज्य पोलीस तपास करत आहेत. सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे." तर सिलीगुडीचे आमदार शंकर घोष म्हणाले, "वंदे भारत एक्स्प्रेसवरील हल्ल्यावर राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी." वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाच्या दोन दिवसांतच, प्रथम मालदाच्या कुमारगंजमध्ये आणि नंतर न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकात ट्रेनवर दगडफेक झाली होती. या घटनांनंतर अवघ्या देशात संतापाची लाट उसळली आहे.

ट्रेनची सुरक्षा वाढवली : घटना हाताळण्यासाठी आणि तपास करण्यासाठी रेल्वे पोलीस आणि आरपीएफला तातडीने पाचारण करण्यात आले आहे. आरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी वंदे भारत ट्रेनमध्ये दोन अधिकारी आणि तीन ते चार सशस्त्र कॉन्स्टेबल देण्यात आले होते. एनजेपीच्या घटनेनंतर ट्रेनमध्ये तीन अधिकारी आणि सहा ते सात सशस्त्र कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते. ट्रेनमध्ये तीन रेल्वे पोलीस कर्मचारीही असतील.

ABOUT THE AUTHOR

...view details