हैदराबाद :वंदे भारत ट्रेनने अवघ्या 52 सेकंदात शून्यावरून 100 किमीचा वेग पकडत बुलेट ट्रेनलाही मागे टाकले आहे. रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत गाड्यांचे डिझाइन विमानापेक्षा चांगले आहे. या ट्रेनद्वारे तुम्ही सर्वात आरामदायी प्रवासाचा अनुभव देऊ शकता. मात्र भारतातील ही अत्यंत वेगवान ट्रेन तयार करण्यामागे कोणाचा हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ती व्यक्ती म्हणजे लखनौचे सुधांशू मणी. मणी यांना भारतातील वंदे भारत ट्रेनचे जनक मानले जाते. ते ICF चे माजी महाव्यवस्थापक आहेत. या आधी त्यांनी जर्मनीतील भारतीय दूतावासात काम केले आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिकंदराबाद आणि विशाखापट्टणम दरम्यान 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेनचा शुभारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने सुधांशू मणी यांची मुलाखत घेतली.
ईटीव्ही भारत : वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवता येईल का? त्यासाठी काय करायला हवे?
सुधांशू मणी : या गाड्या म्हणजे एकप्रकारची क्रांती आहे. यांचे डिझाइन कमी खर्चात आणि वेळ वाचवण्यासाठी केलेले आहेत. आम्ही सुरुवातीला ताशी 200 किमी वेगाने धावण्याऱ्या ट्रेनचे डिझाइन केले आहे. सध्या आम्ही ते ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम केले आहे. पण 200 किमी प्रतितास वेगासाठी त्या पातळीवर पायाभूत सुविधा असायला हव्यात. सध्या 130 किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी आमच्याकडे कोणतीही योग्य पायाभूत सुविधा नाही. दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा, सिकंदराबाद-विशाखापट्टणम या मार्गांवर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यास हा वेग गाठता येईल. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या गाड्या उत्तम आहेत.
ईटीव्ही भारत : देशातील ही नवीन पिढीची ट्रेन बुलेट ट्रेनला पर्याय आहे का?
सुधांशू मणी :बुलेट रेलचे नेटवर्क 58 वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. याने 210 किमी प्रतितास या वेगाने 310 किमीचा वेग गाठला आहे. ती पातळी गाठण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. बुलेट आणि हायस्पीड ट्रेन दोन्ही आवश्यक आहेत. इंटरसिटी ट्रेन फक्त 500 किमीच्या आतच चालतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर कोचची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे.
ईटीव्ही भारत:परदेशात या ट्रेनला बनवायचा खर्च 250 कोटी रुपये असताना तुम्ही तिला 100 कोटींमध्ये कसे बनवले? संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय आहे का?