नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे स्थिती चिंतेची बनत चालली आहे. तर मोदी सरकारच्या आपल्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, तर एकूण कार्यकाळाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, चक्रीवादळ संकट, ऑक्सिजन, शेतकरी आदींवर भाष्य केले. ततसेच शतकातील सर्वात मोठ्या महामारीविरोधात भारत ताकदीने लढत असून प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी पावले उचलण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
'मन की बात' : शतकातील सर्वात मोठ्या महामारीविरोधात भारत ताकदीने लढतोय - मन की बात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, चक्रीवादळ संकट, ऑक्सिजन, शेतकरी आदींवर भाष्य केले. तसेच शतकातील सर्वात मोठ्या महामारीविरोधात भारत ताकदीने लढत असून प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी पावले उचलण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
मोदी
'मन की बात' मधील महत्त्वाचे मुद्दे
- कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशानं आपली संपूर्ण ताकद लावली. गेल्या शंभर वर्षातील ही सर्वात मोठी महामारी आहे. या कोरोना महामारीसोबतच भारताने अनेक नैसर्गिक संकटांचाही सामना केला. अम्फान, निसर्ग तौक्ते, यास ही चक्रीवादळ तर उत्तराखंडमध्ये भूस्खलन आणि भूंकप झाला. मात्र, जनतेने जनता संपूर्ण ताकदीनिशी संकटाचा सामना केला.
- डॉक्टर्स, नर्स आणि आघाडीच्या फळीवरील कोरोना योद्धे, रात्रंदिवस काम करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी खूप मोठी भूमिका बजावली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढली. प्राणवायू गावात पोहचवणे हे आव्हान होते. कारण, ऑक्सिजन वाहून नेणाऱया टँकरचा वेग थोडा वाढला किंवा अगदी लहानशी चूक झाली, तर त्या टँकरचा स्फोट होण्याचा धोका असतो. युद्धपातळीवर काम करून लोकांचे प्राण वाचवण्यात आले.
- देशातील संशोधक, औद्योगिक क्षेत्रातले तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि डीआरडीओ संस्था युद्धपातळीवर काम करत आहे. शंभर वर्षांत अशी मोठे संकट जगावर आले. अशा संकटाचा कोणालाही अनुभव नव्हता. केवळ देशसेवा आणि संकल्पशक्तीच्या जोरावर आपण संकटाचा सामना करत आहोत.
- कोरोनाचा प्रसार झाला. तेव्हा देशात फक्त एक चाचणी प्रयोगशाळा होती. मात्र, आता हजाराहून अधिक प्रयोगशाळा कार्यरत आहे. आतापर्यंत देशात 33 कोटींपेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं.
- देशातील शेतकरी अनेक क्षेत्रातील नवीन व्यवस्थेचा फायदा घेत आहेत. अगरतळातील फणसे लंडनला पाठवले जात आहेत. पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण अशा प्रकारच्या अद्वितीय स्वाद आणि उत्पादनांनी आपला देश परिपूर्ण आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत सुमारे 2 लाख टन शेतमालाची वाहतूक केली आहेत. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला आहे.
- दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण 'मन की बात' कार्यक्रम घेतो. योगायोगाने आजच सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहेत. 'सबका साथ, सबका-विकास, सबका-विश्वास' नुसार काम केले. या काळात मी राष्ट्रीय अभिमानाचे अनेक क्षण अनुभवले आहेत. शत्रू राष्ट्राला भारताने चोख उत्तर दिले. भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांशी तडजोड केली नाही.
- कोरोनावर मात करण्यासाठी सहा फुटाचे अंतर गरजेचे आहे. कोरोना नियमांचे पालन करावे. निष्काळजीपणा केल्यास तो महागात पडेल. नियम पाळणे हाच आपल्या विजयाचा मार्ग आहे.