महाराष्ट्र

maharashtra

PM Narendra Modi : 15 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार लस, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

By

Published : Dec 25, 2021, 10:25 PM IST

Updated : Dec 25, 2021, 11:02 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणास सुरूवात करण्याची घोषणा केली आहे. तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना ( Booster Dose for Frontline Workers ) व आरोग्य क्रमचारी ( Booster Dose for Health Workers ) बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) म्हणाले.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणास सुरूवात करण्याची घोषणा केली आहे. ते आज ( दि. 25 डिसेंबर) देशाच्या जनतेशी संवाद साधत होते. फ्रंटलाईन वर्कर्सना ( Booster Dose for Frontline Workers ) व आरोग्य क्रमचारी ( Booster Dose for Health Workers ) बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) म्हणाले.

बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

140 कोटीपेक्षा अधिक जणांचे लसीकरण पूर्ण

नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी देशात 18 लाख आइसोलेशन बेड ( Isolation Beds ) 1 लाख 40 आयसीयू बेडची ( ICU Beds ) व्यवस्था करण्यात आली आहे. 90 हजार बेड्स विशेषतः लहानग्यांसाठी असणार आहेत. देशात या वर्षी 16 जनवरीपासून सुरुवात झाली होती. सध्या 140 कोटीपेक्षा अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यापैकी 61 टक्के जणांनी दोन डोस घेतले आहे. 90 टक्के नागरिकांनी एक लस घेतली आहे. आता 60 वर्षांवरील पण गंभीर आजार असलेल्या नागरिकांना वैद्यकीय सल्ल्यानुसार लस ( Covid Vaccination ) देण्यात येणार आहे.

घाबरू नका, नियमांचे पालन करा

मोदी म्हणाले, अनेक देशात ओमायक्रॉनचे संकट ( Omicron Variant ) आले आहे. ओमायक्रॉनचा भारतातीस संसर्ग वाढत आहे. ओमायक्रानच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. पण, घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. लसीकरण हे कोरोनाविरोधी लढाईतील सर्वात मोठे शस्त्र आहे.

हे ही वाचा -Agricultural Laws : कृषी मंत्र्यांच्या विधानावरून कृषी कायद्यांबाबत पुन्हा संभ्रम

Last Updated : Dec 25, 2021, 11:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details