नवी दिल्ली -लवकरच देशात लहान मुलांचे कोरोना लसीकरण सुरू होऊ शकते. देशाच्या औषध प्रशासन DGCI ने भारत बायोटेकला कोवॅक्सीन (Covaxin) 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण देण्यासाठी शिफारस केली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी मिळून ही लस विकसित केली आहे.
लवकरच केंद्र सरकार लहान मुलांच्या लसीकरणासंबंधित नियमावली जारी करणार आहे. काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांवर कोवॅक्सीन (Covaxin) ची तपासणी केली जात होती. आतापर्यंत लशीची यशस्वीपणे चाचणीही झाली असल्याचे सूत्रांकडून समजते. लवकरच लसीकरणाची प्रक्रिया, त्याची प्राथमिकता, दोन डोसमधील अंतर याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.