महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IIT Kanpur Recruitment 2022 :आयआयटी कानपूरमध्ये कनिष्ठ सहाय्यकाच्या 119 पदांच्या जागा रिक्त - Vacancy for 119 posts of Junior Assistant

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरने (IIT Kanpur Recruitment 2022) कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही संस्था एकूण 119 पदांची भरती (Vacancy for 119 posts of Junior Assistant) करणार आहे. आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे आणि पात्र आहेत ते अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचा आणि नंतर अर्ज करा.

IIT Kanpur Recruitment 2022
आयआयटी कानपूर

By

Published : Oct 15, 2022, 2:26 PM IST

आयआयटी कानपूरने (IIT Kanpur Recruitment 2022) कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही संस्था एकूण 119 पदांची भरती (Vacancy for 119 posts of Junior Assistant) करणार आहे. आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे आणि पात्र आहेत ते अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट iitk.ac.in वर लॉग इन करणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ नोव्हेंबर २०२२ आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

वयोमर्यादा :आयआयटी कानपूरने जारी केलेल्या माहितीनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन पदवी तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार शिथिलता असावी.

शुल्क भरण्याची पध्दत : कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य,ओबीसी, ईडब्ल्युएस च्या उमेदवारांना 700 रुपये शुल्क जमा करावे लागेल. फी नेट बँकिंग आणि डेबिट,क्रेडिट कार्ड पर्यायांद्वारे भरली जाईल. तर एससी, एसटी, पीडब्ल्युडी आणि महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेतील अर्जाशी संबंधित सर्व अटी व शर्ती वाचून त्यानुसार अर्ज करावा, कारण फॉर्ममध्ये काही विसंगती आढळल्यास अर्ज वैध ठरणार नाही, त्यामुळे हे लक्षात ठेवा.

ही असेल निवड प्रक्रिया :अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ नोव्हेंबर २०२२ आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल. तथापि, निवड प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर हे कानपूर, उत्तर प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कायद्यांतर्गत भारत सरकारद्वारे ही संस्था राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आली.या संस्थेची स्थापना 1959 मध्ये झाली. पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी एक म्हणून, कानपूर इंडो-अमेरिकन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नऊ यूएस संशोधन विद्यापीठांच्या सहयोगाने संस्थेची स्थापना करण्यात आली

ABOUT THE AUTHOR

...view details