देहरादून Uttarkashi Tunnel Accident Rescue : उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात 40 कामगार अडकले आहेत. या कामगारांच्या बचावासाठी पाचव्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. हवाई दलाच्या मदतीनं या कामगारांना वाचवण्यासाठी हेवी ऑगर मशीनचा वापर करण्यात येत आहे. या कामगारांना वाचवण्यासाठी हेवी ऑगर मशीनचा वापर करण्यात येत असल्यानं त्यांना वाचवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांना वाचवण्यासाठी नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीनमुळे बचाव कार्याला वेग येणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
ऑगर मशीनला अपेक्षित यश :सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणण्यात आलेल्या ऑगर मशीनला अपेक्षित यश मिळत आहे. त्यामुळे लष्करांकडून नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीन बुधवारी दिल्लीहून मागवण्यात आलं आहे. हवाईदलाच्या हर्क्युलस विमानानं नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीन पाठवण्यात आल्या आहेत. त्या चिन्यालीसौर विमानतळावरुन सिलक्यारा इथं पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीन ग्रीन कॉरिडॉरमधून सिलक्यारा नेण्यात आली आहे. या मशीनमुळे 40 कामगारांचा जीव वाचवण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.