डेहराडून- आमदार म्हणून निवडणून आल्यानंतर अनेक नेत्यांचे व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे राहणीमान आणि कामाचे स्वरुप बदलते. पण, उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सुतारकाम काम करणाऱ्या फकीर राम टमटा ( BJP MLA Fakir Ram Tamta ) हे आमदार झाले आहेत. तर त्यांचा एक मुलगा सुतारकाम तर दुसरा मुलगा सुतारकाम करत आहे.
उत्तराखंड विधानसभा 2022 ची निवडणूक अनेक अर्थाने इतिहास ठरली आहे. सत्तेत असलेला पक्ष दुसऱ्यांदा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार करून सत्तेत येणार नाही, हा समज भाजपने मोडीत काढला आहे. विधानसभेत पहिल्यांदाच पोहोचणारे अनेक आमदार झाले आहेत. दुसरीकडे आमदार झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदासोबतच त्यांचे नातेवाईकही स्वत:ला आमदारापेक्षा कमी समजत नाहीत. पण, पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोलीहाट मतदारसंघातून भाजपच्या निवडणूक चिन्हावर पहिल्यांदाच आमदार झालेले फकीर राम टमटा यांच्या कुटुंबातील ( BJP MLA from Gangolihat seat ) स्थिती वेगळी आहे. आमदार फकीर राम टमटा हे ( Works of Fakir Ram Tamta Carpenter ) त्यांच्या साध्या राहणीसाठी ओळखले जातात.
पिता आमदार झाल्याचा मुलांवर परिणाम नाही-
पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोलीहाट मतदारसंघातून ( Gangolihat seat of Pithoragarh district ) भाजपचे नवनिर्वाचित आमदार फकीर राम टमटा यांनी फर्निटरचे काम केले. फर्निचरचे काम करून त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालविले आहे. मात्र राजकारणाने त्यांचे नशीब बदलले. आज ते आमदार होऊन जनतेची सेवा करणार ( Fakir Ram Tamta became MLA ) आहेत. मात्र, आमदार झाल्याचा प्रभाव त्यांच्या दोन्ही मुलांवर अजिबात नाही.