महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 8:12 AM IST

Updated : Nov 24, 2023, 12:01 PM IST

ETV Bharat / bharat

बोगद्यात अडकलेल्या मजुरांची आज सुटका होणार? अमेरिकेतील मशीन असूनही बचावकार्यात 'हा' आहे मोठा अडथळा

13th day of rescue in Silkyara Tunnel of Uttarkashi : उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यातील ऑजर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं गुरुवारी जास्त काम होऊ शकलं नाही. रात्री उशिरापर्यंत तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री धामी गुरुवारी रात्रभर सिलक्यारा बोगदा बचाव स्थळावर थांबले. आज पुढील बचावकार्य सुरू होईल. उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेच्या 13 व्या दिवशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

उत्तरकाशी बोगद्यातील बचावकार्याचा 13वा दिवस
उत्तरकाशी बोगद्यातील बचावकार्याचा 13वा दिवस

उत्तरकाशी (उत्तराखंड) 13th day of rescue in Silkyara Tunnel of Uttarkashi : बुधवारी रात्रीपर्यंत उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात 45 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आलं होतं. रात्री उशिरा अचानक एक कठीण वस्तू ड्रिल मशीनवर आदळली. तो स्टील पाईप असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर सकाळपर्यंत ते पाईप कापण्याचं काम सुरू होतं. गुरुवारी बचाव कार्यात अनेक अडथळे आले. पहिल्या ऑगर ड्रिलिंग मशीनचा प्लॅटफॉर्म कोसळला. त्यानंतर ऑगर मशीनमध्ये तांत्रिक समस्या आली. त्यामुळं गुरुवारी पाईप केवळ 1.8 मीटर आत ढकलता आलं.

46.8 मीटरपर्यंत केलं ड्रिलिंग : सिलक्यारा बोगद्यात बचावासाठी 60 मीटरपर्यंत ड्रिलिंग करावं लागणार आहे. कारण गेल्या 13 दिवसांपासून 41 कामगार बोगद्याच्या 60 मीटर आत मलबा पडलाय. त्यामुळे आता सुमारे 14 मीटर अधिक ड्रिलिंग करावं लागणार आहे. ड्रिलिंगच्या मार्गात कठीण अडथळा आला नसता तर गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी बचावकार्य पूर्ण झालं असतं. ड्रिलिंगच्या मध्यभागी आलेल्या स्टीलच्या रॉडमुळं बचावकार्यात विलंब झाला.

  • बचावकार्य आज होऊ शकतं पूर्ण : बचावकार्याच्या ठिकाणी सर्व तांत्रिक समस्यांचं निराकरण करण्यात आलंय. आज, या दुर्घटनेच्या 13 व्या दिवशी सिलक्यारा बोगद्यातील बचावकार्य पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत 46.8 मीटर अंतरापर्यंत पाईप ड्रिल करून टाकण्यात आले आहेत.

बंगळुरुहून आले बोगदा खाण तज्ज्ञ : उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य चालू आहे. देशातील सर्वात मोठे बोगदेतज्ज्ञ आणि खाण तज्ज्ञदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. बंगळुरू येथील स्क्वाड्रन इन्फ्राच्या सहा टनेलिंग खाण तज्ञ अभियंत्यांची टीम सिलक्यारा बोगद्यावर पोहोचली आहे. ही टीम गुरुवारी रात्री सिलक्यारा बोगद्यावर पोहोचली. एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं बोगद्यातील परिस्थितीची माहिती घेतली. बंगळुरु येथील बोगदा खाण तज्ज्ञ अभियंत्यांच्या टीमचा हा अहवाल भविष्यातील बचावकार्यात अत्यंत उपयुक्त ठरेल. तसेच सिलक्यारा बोगदा बचाव कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

  • BRO ने बेंगळुरुहून दोन ड्रोन मागवले : सिलक्यारा बोगदा बचाव मोहिमेतील अडथळे दूर करण्यासाठी, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं बेंगळुरुहून दोन ड्रोन मागवलं होतं. गुरुवारी हे ड्रोन सिलक्यारा बोगदा रेस्क्यू साइटवरही पोहोचले. या अत्याधुनिक ड्रोननं ढिगाऱ्याबाबत अचूक माहिती दिली.

सीएम धामी सिलक्यारा बोगद्याजवळ पोहोचले: दिल्लीहून पंतप्रधान मोदी उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्याचं क्षणोक्षणी अपडेट घेत आहेत. अशा परिस्थितीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी स्वतः सिलक्यारा रेस्क्यू साइटवर तळ ठोकून आहेत. रात्री उशिरा ऑगर ड्रिलिंग मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला तेव्हा सीएम धामी रात्रभर रेस्क्यू टीम आणि तंत्रज्ञांसह सिलक्यारा बोगद्यावर होते. यावेळी, तंत्रज्ञ अमेरिकन हेवी ऑगर मशीनच्या तांत्रिक समस्या सोडवण्यात व्यस्त होते.

हेही वाचा :

  1. काही वेळातच सिलक्यारा बोगद्यातून कामगार येणार बाहेर, रुग्णवाहिका, चिनूक हेलिकॉप्टरही सज्ज
  2. बोगद्यातील मजुरांच्या सुटकेकरिता काम करणारे कोण आहेत प्रोफेसर डिक्स, बचावपथकाच्या मोहिमेत आजपर्यंत काय घडलं?
  3. सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाटत आहे अस्वस्थ, सलग आठव्या दिवशी बचाव मोहिम सुरू
Last Updated : Nov 24, 2023, 12:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details