डेहराडून -प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांच्यादिवसाढवळ्या हत्या केलेल्या आरोपींना अटक करण्याकरिता पंजाब पोलिसांचे प्रयत्न ( Punjab Police in singer Sidhu Musewala case ) सुरू आहेत. उत्तराखंड एसटीएफ आणि पंजाब एसटीएफने ( Uttarakhand STF and Punjab STF ) डेहराडून पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत शिमला बायपास नया गाव चौकी येथे नाकाबंदी केले. या हत्याकांडातील आरोपींना मदत करणाऱ्या 6 जणांना ताब्यात घेतले ( Six people arrested in Musewala murder ) आहे. आरोपींना पंजाब पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमकुंड साहिब यात्रेवरून ( Hemkund Sahib Yatra ) सुमारे 6 लोक पंजाबच्या दिशेने परत जात असताना उत्तराखंड एसटीएफ आणि पटेल नगर नया गाव चौकी पोलिसांनी पंजाब एसटीएफच्या माहितीच्या ( Punjab STF information ) आधारे वाहन थांबवले. यावेळी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धू हत्याकांडातील मुख्य आरोपीला वाहन आणि आश्रय देण्याच्या प्रकरणात या आरोपीने ( Sidhu murder case ) मदत केली होती. यासह अन्य ५ जणांनाही पोलिसांनी संशयाच्या आधारे ताब्यात घेतले. सध्या उत्तराखंड पोलिसांनी या अटकेबाबत कोणतीही माहिती जाहीर केली नाही.
सिद्धूच्या शवविच्छेदनादरम्यान कुटुंबीय तेथे उपस्थित होते. त्याचवेळी रुग्णालयाबाहेर त्यांचे अनेक चाहतेही उपस्थित होते. मुसेवाला यांच्या पोस्टमॉर्टम अहवालात त्यांचे संपूर्ण शरीर गोळ्यांनी छिन्नविछिन्न असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पंजाब एसटीएफने दिले होते इनपुट-प्राथमिक माहितीनुसार, पंजाब गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाशी संबंधित लोकांना पकडण्यासाठी पंजाब एसटीएफने उत्तराखंड एसटीएफला अहवाल दिला होता. उत्तराखंड एसटीएफने पटेल नगर पोलिसांच्या सहकार्याने शिमला बायपासला वेढा घातला. तिथे वाहन क्रमांकानुसार काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पंजाब एसटीएफची टीम या लोकांची पोलीस कोठडीत चौकशी करत आहे. त्याचवेळी स्थानिक गुप्तचर आयबीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ते तपासात गुंतले आहेत.