महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Uttarakhand: दारूच्या नशेत पतीने पत्नीला जुगारात लावले पणाला, हरल्यास विजेत्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी टाकला दबाव - हुंडाबळी छळ प्रकरण लक्सर

लक्सरमध्ये, नशेच्या आहारी गेलेल्या पतीने जुगारात पत्नीला पणाला लावले. पत्नी सहमत नसताना त्याने तिला इतर जुगाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. महिलेने विरोध केल्यावर तिला तिहेरी तलाक दिला. याप्रकरणी आता 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By

Published : Jun 20, 2022, 5:49 PM IST

लक्सर : कलियुगी व्यसनी पतीने पत्नीला जुगारात पणाला लावल्याची घटना समोर आली आहे. महिलेचा आरोप आहे की, पती जुगारात हरला आणि तिला इतर जुगाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग ( man lost wife in gambling ) पाडले. या महिलेने सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ आणि मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. महिलेने न्यायालयात पत्र देऊन आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, सहा नाव आणि दोन अनोळखी अशा एकूण आठ जणांविरुद्ध प्रभावी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली परिसरात राहणाऱ्या आशिफा (काल्पनिक नाव) या महिलेने कोर्टात पत्र देऊन सांगितले की, मार्च 2021 मध्ये आसिफ रहिवासी तोडा कल्याणपूरसोबत मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न झाले होते. ज्यामध्ये त्यांच्या नातेवाइकांनी त्यांच्या दर्जापेक्षा जास्तीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोटारसायकलसह तब्बल सात लाखांचा हुंडा खर्च केला होता. मात्र लग्नाच्या वेळेपासून दिलेल्या हुंड्यात महिलेचे सासरचे लोक खुश नव्हते. महिलेला मारहाण करून गाडीची मागणी केल्याचा आरोप आहे. कालांतराने सासरच्या मंडळींकडून महिलेवर होणारा छळ वाढत गेला.

महिलेने तहरीरमध्ये सांगितले की, तिचा नवरा ड्रग्ज आणि जुगारी आहे. तो रोज दारूच्या नशेत तिला मारहाण करतो आणि पैशांची मागणी करतो. महिलेने तिचा भूतकाळ सांगितला की नोव्हेंबर 2021 मध्ये अशी घटना घडली होती की ड्रग्सच्या आहारी गेलेल्या पतीने तिच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले आणि पैशाची मागणी केली. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने पती आसिफने तिला बेदम मारहाण केली. ती ओरडतच राहिली, पण तिला वाचवायला कुणीच आलं नाही.

या सर्व परिस्थितीचा फायदा घेत तिचा दीर साकिब याने तिच्या खोलीत घुसून जबरदस्तीने गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने आरडा ओरड केल्याने तिचे सासरे, सासू आणि वहिनी घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांनी उलट महिलेलाच दोष देण्यास सुरुवात केली. यानंतर पतीने बाहेर जाऊन तिला जुगाराच्या डावावर लावले आणि दोन अनोळखी व्यक्तींसह घरी आला आणि जुगारात हरलो असून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेव, असे सांगितले, असा आरोप पीडितेने केला आहे.

त्याचवेळी पीडितेने विरोध केला असता पतीने तिला तिहेरी तलाक दिला. यासोबतच अज्ञात जुगाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग ( Physical contact with unknown gamblers ) पाडले. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार देऊन सासरच्या मंडळींसह अज्ञात जुगारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सद्यस्थितीत न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी पती आसिफ, सासरा युसूफ, सासू रिहाना यांच्यासह 6 जण व दोन अनोळखी जुगारी अशा एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले कोतवाली प्रभारी?कोतवाली प्रभारी यशपाल सिंह बिश्त यांनी सांगितले की, महिलेच्या पतीने जुगारात महिलेला पणाला लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. यासोबतच महिलेने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींविरुद्ध प्रभावी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा -बल्लारी किल्ल्यात सापडलेले ३९ प्राचीन तोफगोळे शिवाजी महाराजांचे वडिल शहाजींच्या काळातील - संशोधक

ABOUT THE AUTHOR

...view details