महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Kanwar Yatra कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द - Kanwar Yatra 2021

मंगळवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत कावड यात्रा 2021 (Kanwar Yatra) स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कावड यात्रा
कावड यात्रा

By

Published : Jul 13, 2021, 8:26 PM IST

Updated : Jul 13, 2021, 9:43 PM IST

डेहराडून - उत्तराखंडने कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण असताना कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, की कावड यात्रा हा धार्मिक श्रद्धेचा विषय आहे. लोकांना जीव गमवावा लागला तर ईश्वरलाही आवडणार नाही. लोकांचे जीव वाचविण्याला आमचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी म्हटले आहे.

कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याच्या शक्यतेने यंदा लोकांना कावड घेऊन जाता येणार नाही. नुकतेच इंडियन मेडकिल असोसिएशनने धार्मिक यात्रा या सुपर स्प्रेडर ठरू शकतात, असा इशारा दिला होता. त्याकडे राज्यांनी दुर्लक्ष करू नये, असेही आयएमएने म्हटले होते.

हेही वाचा-फॉरेनच्या वधूने नागपुरातील व्यक्तीची ४० लाखांनी केली फसवणूक; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

मंगळवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत कावड यात्रा 2021 (Kanwar Yatra) स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष प्रीतम सिंह यांनीही कावड यात्रेबाबत लवकर निर्णय घेण्याची उत्तराखंड सरकारकडे मागणी केली होती.

हेही वाचा-बलात्कार आरोपी राम रहीमची प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये दाखल, तपासणीनंतर दिली सुट्टी

श्रावण महिन्यात दरवर्षी आयोजित होते कावड यात्रा

यंदा 23 जुलैला श्रावण महिन्याचा प्रारंभ होणार आहे. या काळात शिवभक्त हे गंगा आणि अन्य नदीमधून जल घेऊन शिवमंदिरात अर्पण करतात. ही यात्रा कावड यात्रा म्हणून ओळखली जाते. गतवर्षीही राज्य सरकारने कावड यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली होती.

हेही वाचा-VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गाठलं मंगल कार्यालय, लग्नाच्या दिवशीच नववधूवर गुन्हा दाखल

Last Updated : Jul 13, 2021, 9:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details