चमोली - उत्तराखंडमधील जोशीमठ येथील हिमस्खलन होऊन सहा दिवस झाले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार ३६ जणांचे मृतदेह सापडले असून अजूनही २०६ जण बेपत्ता आहे. तपोवन आणि ऋषीगंगा उर्जा प्रकल्पातील बोगद्यातून चिखल, माती काढण्याचे काम सुरू असून बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत.
नदीची पाणीपातळी वाढल्याने बचावकार्य खोळंबले होते -
ऋषीगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने काही काळ बचावकार्य थांबले होते. तपोवन येथील बोगद्यात आणखी ३० कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आत्तापर्यंत चिखलाच्या ढिगाऱ्यातून ३६ मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. तर २०४ कामगार अद्यापही बेपत्ता आहेत. नदीकिनारी राहणारे गावकरीही या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.