डेहराडून (उत्तराखंड) : PM Modi Dress Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथ दौऱ्यावर Pm Modi visit Kedarnath आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत काँग्रेस आक्रमक झाली आहे. विशेषत: काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या पेहरावावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी केदारनाथमध्ये पीएम मोदींनी परिधान केलेला पोशाख अशुभ आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. Uttarakhand Congres Targets on PM Modi
आज केदारनाथमध्ये पूजेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पारंपरिक हिमाचली पोशाखात दिसले. त्यांनी हिमाचल प्रदेशचा 'चोला डोरा' ड्रेस परिधान केला होता. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, मात्र काँग्रेसने या ड्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या गरिमा दसोनी यांच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींच्या पोशाखावर पीएम मोदींच्या पाठीवर स्वस्तिक चिन्ह Swastik symbol on PM Modi Dress आहे, जे अशुभ आणि आक्षेपार्ह आहे. पंतप्रधान मोदी बाबा केदारच्या दराने संपूर्ण वेदपुराणच बदलून टाकतील असे दिसते.