चमोली -सीमावादाबाबत भारताबरोबर चर्चेच्या फेऱ्या करणाऱ्या चीनच्या अद्यापही कुरापती सुरू आहेत. चीनच्या सैनिकांनी भारतीय सीमेजवळ बाडाहोती क्षेत्राजवळ एक पुलाचे नुकसान केले आहे. 30 ऑगस्टला 100 चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघन करून उत्तराखंडमधील बाडाहोती सेक्टरमध्ये घुसखोरी केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर हे चिनी सैनिक काही तासानंतर परतले होते. त्याबाबत उत्तराखंड सरकारने अधिक माहिती नसल्याचे सांगितले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींना चिनी सैनिकांच्या घुसखोरीबाबत विचारले असता त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे म्हटले आहे. केवळ माध्यमांतून माहिती मिळाली आहे. एजन्सींचे काम आहे, ते आपले काम करत आहे, असे पुष्कर सिंह यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-मोरया...! भारत-चीन सीमेवर दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकृती मूर्तीची प्रतिष्ठापना
भारत-तिबेट सीमा पोलीस तैनात
भारत-तिबेट सीमा पोलिसाचे (ITBP) जवान बाडाहोती भागामध्ये तैनात आहेत. सुत्राच्या माहितीनुसार भारतीय सैनिकांनी रणनीतीच्या दृष्टीने या भागामध्ये गस्त घातली आहे. चिनी सैनिक हे भारतीय सीमेत आल्याबाबतची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पूर्व लडाखसह इतर भूभागामध्ये चीन व भारतामध्ये वाद असताना आणखी नव्या घुसखोरीच्या घटनेची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा-चीनच्या सायबर हॅकरकडून भारतीय माध्यमांसह आधार संस्थेवर हल्ला- इनसिक्ट ग्रुप