कोटद्वार (उत्तराखंड): Uttarakhand Bus Accident: पौडी जिल्ह्यात आज 4 सप्टेंबर रोजी लग्नातील वराती असलेली बस 300 मीटर खोल नायर नदीत पडल्याने लग्नाचा आनंद शोकात wedding Bus fell into ditch बदलला. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस लालधंगहून कराटल्लाकडे जात असताना बिरोंखल येथील सीएमडी बँडजवळ भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट नायर नदीत पडली. Bus Accident in Lansdowne
Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडमध्ये बस नदीत पडली, 6 जणांचा मृत्यू, 35 अद्याप बेपत्ता - लैंसडाउनमध्ये मोठा रस्ते अपघात
Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे लग्नातील वराती असलेली बस नायर नदीत wedding Bus fell into ditch पडली. स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतली आहे. बचाव पथकाने आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. Bus Accident in Lansdowne
![Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडमध्ये बस नदीत पडली, 6 जणांचा मृत्यू, 35 अद्याप बेपत्ता Bus carrying 50 people falls into gorge in Pauri Garhwal district in Uttarakhand](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16556092-402-16556092-1664900198368.jpg)
उत्तराखंडमध्ये बस नदीत पडली, 6 जणांचा मृत्यू, 35 अद्याप बेपत्ता
बसमध्ये 50 हून अधिक लोक होते असे सांगण्यात येत आहे. रेस्क्यू ऑपरेशन टीमने आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर काढले आहेत. अंधारामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अद्याप 35 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याचवेळी अपघाताची माहिती मिळताच सरकारही कामाला लागले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही थेट उत्तराखंड सचिवालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात पोहोचून बचाव कार्याची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांकडून अपघाताची माहिती घेतली.