श्रीनगर विधानसभा मतदारसंघात सकाळपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदिया हे आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपच्या धन सिंह रावत यांनी आघाडी घेतली व ते विजयी झाले.
Uttarakhand Election Result 2022 : गड आला पण सिंह गेला, भाजपची सत्ता मात्र मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव - Uttarakhand nivadnuk Result 2022
16:50 March 10
चुरशीच्या लढाईत काँग्रेसच्या गणेश गोदियाल अपयशी, धन सिंह रावत विजयी
16:06 March 10
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव, 6 हजार 951 मतांनी काँग्रेसच्या कापडी यांचा विजय
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभ झाला आहे. काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष भुवन कापडी यांनी पुष्कर सिंह धामी 6 हजार 951 मतांनी पराभव केला.
15:03 March 10
हरीश रावत पराभूत, अनुपमा रावत विजयी
लालकुआं विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे दिग्गज नेता हरीश रावत यांचा पराभव झाला आहे. लालकुआं विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मोहन सिंह बिष्ट यांनी सुमारे 14 हजार मतांची रावत यांना पराभूत केले. त्यांची मुलगी अनुपमा रावत हरिद्वार ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आली आहे. मसूरीतून भाजप आमदार गणेश जोशी, ऋषिकेशहून प्रेमचंद अग्रवाल, डोईवाला येथून भाजप उमेदवार बृजभूषण गैरोला व लोहाघाट येथून काँग्रेसचे खुशाल सिंह अधिकारी यांचा विजय झाला आहे. रायपूर विधानसभा मतदारसंघातून उमेश शर्मा काऊ, जसपूर विधानसभा मतदारसंघातून आदेश चौहान व प्रतापनगर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विक्रम सिंह नेगी हे विजयी ठरले आहेत कँट विधानसभा मतदारसंघातून दिवंगत हरबंस कपूर यांची पत्नी सविता कपूर यांचा विजय झाला आहे.
12:10 March 10
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पुन्हा पिछाडीवर, 10 हजार मतांनी हरीश रावत यांची पिछेहाट
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पुन्हा पिछाडीवर गेले असून काँग्रसचे हरीश रावत हे देखील 10 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
10:59 March 10
मुख्यमंत्री धामी यांनी घेतली आघाडी
खटीमा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे सकाळपासून पिछाडीवर होते. ते आता आघाडीवर आले आहेत तर काँग्रेसचे भुवन कापडी हे यांची पीछेहाट झाली आहे.
10:37 March 10
धक्कादायक कल, अनेक दिग्गज नेते पिछाडीवर
काँग्रेस नेता हरीश रावत 7 हजार मतांनी पिछाडीवर आहेत तर खटीमा मतदारसंघातून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी एक हजार मतांनी पिछाडीवर आहेत. लॅन्सडाउन येथून अनुकृति गुसाईं एक हजार मतांनी पिछाडीवर आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल 700 मतांनी आघाडीवर आहेत.
10:04 March 10
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पिछाडीवर
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पिछाडीवर आहेत. तसेच काँग्रेसचे दिग्गज नेते हरीश रावत हेदेखील पिछाडीवर आहेत.
09:33 March 10
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आघाडीवर तर काँग्रेसचे दिग्गज उमेदवार हरीश रावत पिछाडीवर
खटीमा मतदारसंघातून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे दिग्गज उमेदवार हरीश रावत हे लालकुंआ मतदारसंघातून मैदानात उतरले असून ते सध्या पिछाडीवर आहेत.
09:22 March 10
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल आघाडीवर
श्रीनगर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल हे आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात मंत्री धन सिंह रावत हे भाजपचे उमेदवार आहेत.
09:11 March 10
सकाळी 9 वाजेपर्यंतचे चित्र
हरिद्वार मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांची आघाडी घेतली असून आपच्या मुख्यमंत्री पदाची उमेदवार कर्नल अजय कोठियाल गंगोत्री मतदारसंघातून पिछाडीवर आहेत चकराता येथून प्रीतम सिंह 1 हजार 300 मतांनी आघाडी घेतली आहे. हरक सिंह रावत यांची सून अनुकृती गुसाईं पिछाडीवर आहेत.चौबट्टाखाल येथून सतपाल महाराज व रुद्रपूर येथून भाजपचे उमेदवार शिव अरोडा आघाडीवर आहेत.
09:01 March 10
उत्तराखंडमध्ये काँग्रेस 21 तर भाजपची 17 जागांवर आघाडी
उत्तराखंडमध्ये काँग्रेस 21 तर भाजपची 17 जागांवर आघाडी आहे. पार्श्वगायक जुबीन नौटीयाल यांचे वडील रामशरण नौटियाल हे चकराता मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ते पिछाडीवर आहेत.
08:58 March 10
ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात
सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टल मतमोजणी सुरू होती. आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
08:57 March 10
आपच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अजय कोठियाल पिछाडीवर
आपच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अजय कोठियाल पिछाडीवर हे गंगोत्री विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
08:52 March 10
हरक सिंह रावत यांची सून पिछाडीवर
लॅन्सडाउन मतदारसंघातून अनुकृति गुसाईं, हरिद्वारमधून मदन कौशिक, चकरातामधून रामशरण नौटियाल, सल्ट येथून रणजीत सिंह रावत पिछाडीवर. मसूरी येथून गणेश जोशी, ऋषिकेशमधून प्रेमचंद अग्रवाल, चकराता येथून प्रीतम सिंह, सोमेश्वर येथून रेखा आर्य, नैनीतालमधून संजीव आर्य, डीडीहाटयेथून बिशन सिंह चुफाल व बाजपूर येथून यशपाल आर्य आघाडीवर आहेत.
08:34 March 10
भाजपचे प्रदेशाध्यक्ष पिछाडीवर, काँग्रसेच दिग्गज नेते आघाडीवर
हरिद्वार मतदारसंघातून मदन कौशिक (भाजप), लॅन्सडाउन मतदारसंघातून अनुकृति गुसाईं ( काँग्रेस ) पिछाडीवर आहेत तर प्रीतम सिंह (काँग्रेस), संजीव आर्य (काँग्रेस), बिशन सिंह चुफाल (भाजप) व यशपाल आर्य (काँग्रेस) आघाडीवर आहेत.
08:22 March 10
काँग्रेस 9 तर भाजप 5 जागांवर आघाडी
मतमोजणीला सुरुवात झाली असून काँग्रेसने 9 तर भाजपने 5 जागांवर आघाडी घेतली आहे.
08:17 March 10
मतमोजणी सुरू
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यातील सर्व 13 जिल्ह्यांमध्ये मतमोजणी सुरु झाली आहे. मैदानात 632 उमेदवार उतरले असून 70 जागांसाठीचा निवडणूक झाली होती.
07:44 March 10
काँग्रेस 48 जागांवर मिळवेल विजय - हरीश रावत
उत्तराखंडमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल मला विश्वास आहे. येत्या 2-3 तासांतच सर्व काही स्पष्ट होईल. माझा राज्यातील जनतेवर विश्वास असून काँग्रेसला सुमारे 48 जागेवर विजय मिळवता येईल, असा विश्वास उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी व्यक्त केला.
06:20 March 10
Uttarakhand Election Result 2022 : भाजपची सत्ता, पण मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव
डेहराडून ( उत्तराखंड )- उत्तराखंड विधानसभा मतदानाचा निकाल ( Uttarakhand Election Result 2022 ) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अनेक मुद्द्यावरून या निवडणुकीतील प्रचार सभा गाजल्या. राज्यातील 70 विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 632 उमेदवार रिंगणात उतरले असून त्यापैकी केवळ 62 महिला उमेदरवार आहेत. राज्यात 81 लाख 72 हजार 173 मतदार आहेत. त्यापैकी 53 लाख 42 हजार 462 मतदारांनी मतदान केले आहे. काही तासांत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार ( Election Result Live Update in Marathi ) असून जनतेचा कौल कोणाकडे असेल हे चित्र स्पष्ट होणार आहे.
632 जणांच्या नशिबाचा आज होणार फैसला- उत्तराखंड विधानसभा निवडणूक निकाल 2022 मध्ये मुख्य दोन्ही राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त इतर पक्ष व अपक्ष, असे 632 जण रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या नशिबाचा आज फैसला होणार आहे. निवडणूक आल्यानंतर कशा प्रकारे बहुमत सिद्ध करायचे. स्पष्ट बहुमत नसल्यास सरकार स्थापन करताना कोणाची मदत घ्यावी लागले, कोणाकडे कोणते मंत्रीपद असेल, याबाबत दोन्ही प्रमुख पक्ष नियोजन करत आहेत.
धक्कादायक असेल निकाल- राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, 2017 च्या तुलनेत 2022 ची निवडणूक शांततेत पार पडली आहे. मोठ्या संख्येने मतदारांनी आपले मतदान केले. त्यामुळे धक्कादायक निकाल येण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष बहुमत सिद्ध करत आम्ही सिंहासनाधीश होऊ, असा दावा करत आहे.
महागाई, बेरोजगारी अन् स्थलांतर या मुद्द्यावर गाजल्या सभा- या निवडणुकीच्यावेळी महागाई, बेरोजगारी व स्थलांतर हे प्रचारासाठीचे मुख्य मुद्दे होते. या मुद्द्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगली बॅटींग केली. याच मुद्द्यावर काँग्रेसच्या सभा गाजल्या. तसेच भाजपच्या स्टार प्रचारकांनी जनसभा, व्हर्च्युअल सभा व रॅली घेत निवडणुकीचा प्रचार प्रसार केला. 2017 पासून राज्यात सत्ता असूनही भाजपकडून राज्यातील महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.