महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dalit Sister Rape and Murder UP : दलित मुलींवर बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या 6 जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केली अटक - killed Dalit girls in Lakhimpur Kheri

दोन दलित मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मित्रांनी त्यांना ऊसाच्या शेतात नेले आणि मुलींवर बलात्कार Dalit Sister Rape and Murder UP केला. आरोपींनी त्यांच्या इतर दोन मित्रांना फोनवरून बोलावून घेत मुलींवर बलात्कार करायला लावला. यानंतर दोन्ही मुलींची हत्या करून त्यांचा मृतदेह झाडाला टांगला. ही घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या गावात अलीकडेच घडली. two dalit sisters murder after rape

दलित मुलींना ऊसाच्या शेतात नेले अन् केला आळीपाळीने बलात्कार
दलित मुलींना ऊसाच्या शेतात नेले अन् केला आळीपाळीने बलात्कार

By

Published : Sep 15, 2022, 6:12 PM IST

लखीमपूर खीरी (उत्तर प्रदेश) :दोन दलित मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मित्रांनी त्यांना ऊसाच्या शेतात नेले आणि मुलींवर बलात्कार Dalit Sister Rape and Murder UP केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींनी अटक केली आहे. आरोपींनी त्यांच्या इतर दोन मित्रांना फोनवरून बोलावून घेत मुलींवर बलात्कार करायला लावला होता. यानंतर दोन्ही मुलींची हत्या करून त्यांचा मृतदेह झाडाला टांगला. ही घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या गावात अलीकडेच घडली आहे. two dalit sisters murder after rape. मृतक मुली दहावी आणि सातव्या वर्गाची विद्यार्थिनी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

एसपी संजीव सुमन दलित मुलींवरील बलात्काराची माहिती देताना

उत्तर प्रदेश हादरले - एसपी संजीव सुमन यांच्या म्हणण्यानुसार जुनैद, सुहैल, हफीजुर्रहमान उर्फ मझिलका अशी तीन आरोपींची नावे आहेत. या तीन मुलांनी दलित मुलींना पळवून नेले आणि ऊसाच्या शेतात नेऊन बलात्कार केला. मग अजून दोन पोरांना बोलावून बलात्कार केला. यानंतर सर्वांनी आलटून-पालटून दलित मुलींवर बलात्कार केला. आरोपींनी पुरावे पुसण्यासाठी त्याच मुलींच्या दुपट्ट्याने त्यांना झाडाला लटकवले. या प्रकरणी पोलिसांनी जुनैदला अटक केली होती. उर्वरित आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. एसपी संजीव सुमन यांनी सांगितले की, दलित मुलींची आरोपी मुलांशी अलीकडेच मैत्री झाली होती. दोन्ही मुली स्वेच्छेने मुलांसोबत गेल्या. आरोपींनी मुलींना आमिष दाखवून गोवलं. मुलींना मुलांशी लग्न करायचे होते आणि त्यांचा आग्रह होता. जुनैद आणि त्यांच्या दोन साथीदारांनी बलात्कारानंतर दोन्ही मुलीं हत्या केली. यानंतर दोघांचे मृतदेह दुपट्ट्याने लटकवण्यात आले. पोलिसांनी आणखी दोन आरोपी कलीमुद्दीन उर्फ ​​डीडी आणि आरिफ रा. लालपूर यांनाही अटक केली आहे.

मृतदेहांचे शवविच्छेदन होणार -निघासन कोतवाली क्षेत्रात दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यांनी सांगितले की, शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींची हत्या केल्यानंतर मृतदेह झाडाला लटकवण्यात आला होता. आरोपी आणि तरुणी एकमेकांचे मित्र होते. आरोपींनी दोन्ही बहिणींना लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेले होते. बलात्कार आणि हत्येचे प्रकरण लपवण्यासाठी आरोपींनी दोघांचेही मृतदेह झाडाला लटकवले होते, जेणेकरून लोकांना वाटेल की दोघांनी आत्महत्या केली आहे, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

जुनैबला गोळी लागल्याने जखमी - लखीमपूर येथील दलित मुलींची हत्या आणि बलात्काराचा आरोपी जुनेबला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. चकमकीदरम्यान जुनैबला गोळी लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचे साक्षीदार आहेत. आरोपी कुटुंबाचे शेजारी आहेत. सर्व सहा आरोपी मित्र आहेत. जुनैद, सोहेल, आरिफ, हाफीज, करीमुद्दीन आणि छोटे अशी आरोपींची नावे आहेत.

मुली 10वी आणि 7वीच्या विद्यार्थिनी -बुधवारी निघासन कोतवाली परिसरात दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयजी लक्ष्मी सिंह देखील लखनौ लखीमपूरला रवाना झाले आहेत. यापैकी एक मुलगी दहावीची तर दुसरी सातवीची विद्यार्थिनी आहे. मृत मुलींच्या आईने जवळच्या गावातील तीन मुलांवर आपल्या मुलींचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप केला आहे. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, तीन दुचाकीस्वार मुलांनी मुलींना गावाजवळून नेले होते.

कपड्यांची फॉरेन्सिक तपासणी होणार - माहितीनुसार, दोन्ही मुली आरोपींवर लग्नासाठी दबाव टाकत होत्या. त्यामुळेच दोन्ही आरोपींनी चिडून मुलींचा बलात्कार आणि हत्या केली. यानंतर दोन्ही बहिणींचे मृतदेह एकाच स्कार्फने खैराच्या झाडाला लटकवले होते. एसपी म्हणाले की, हा प्राथमिक तपास आहे. सध्या आम्ही पोस्टमार्टम करत आहोत. कुटुंबीयांच्या इराद्यानुसार दोन्ही बहिणींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. आरोपींचे कपडे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details