महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Uttar Pradesh Phase 4 Updates : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.45 टक्के मतदान - UP Assembly elections 2022 LIVE

युपी
Uttar Pradesh Phase 4 Updates

By

Published : Feb 23, 2022, 7:16 AM IST

Updated : Feb 23, 2022, 7:00 PM IST

18:14 February 23

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.45 टक्के मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा 2022 च्या चौथ्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत नऊ जिल्ह्यातील 59 विधानसभांसाठी मतदान झाले आहे. यामध्ये लखीमपूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. पीलीभीत मतदारसंघात मतदान दुसऱ्या क्रमांकावर झाले आहे.

14:00 February 23

दुपारी 1 वाजेपर्यंत 37.45%टक्के मतदान

दुपारी 1 वाजेपर्यंतचे मतदान

12:26 February 23

| राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी चौथ्या टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर लखीमपूर खेरीच्या बनबीरपूर येथील मतदान केंद्रातून बाहेर पडले.

12:20 February 23

सकाळी 11 वाजेपर्यंत 22.62 टक्के मतदान झाले आहे.

नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत.

11:58 February 23

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी लखनौमधील मतदान केंद्रावर मतदान केले.

10:54 February 23

10:38 February 23

देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी लखनौमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

10:15 February 23

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपा सत्तेत येणार असा विश्वास देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

10:15 February 23

गायिका मालिनी अवस्थी यांनी लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

09:41 February 23

उत्तर प्रदेशात आज चौथ्या टप्प्यात मतदान, सकाळी 9 वाजेपर्यंत 9.10 टक्के मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत 9.10 टक्के मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत 9.10 टक्के मतदान

08:50 February 23

भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी उन्नाव येथील गदन खेरा प्राथमिक शाळेत मतदान केले.

भाजप उन्नावमधील सर्व 6 जागा बहुमताने जिंकेल. मी केलेल्या सर्व प्रचाराच्या आधारे मी असे म्हणू शकतो की मुख्यमंत्री योगी 2017 चा त्यांचाच विक्रम मोडून पुन्हा सरकार स्थापन करतील. मला वाटते की संख्या 350 पर्यंत जाऊ शकते, असे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी म्हटलं.

07:50 February 23

627 उमेदवार आजमावणार नशीब

07:49 February 23

या 9 जिल्ह्यातील मतदारसंघात मतदान

07:49 February 23

या मतदारसंघात आज मतदान

07:49 February 23

या मतदारसंघात मतदाते बजावणार मतदानाचा हक्क

07:49 February 23

07:19 February 23

बसप नेत्या मायावती यांनी लखनौमध्ये नर्सरी स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

07:14 February 23

आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू -

आज चौथ्या टप्प्यात (UP 4th phase election) 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. यामध्ये रोहिलखंड ते तराई बेल्ट आणि अवध प्रदेशापर्यंत 624 उमेदवार रिंगणात आहेत. रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनौ, उन्नाव, फतेहपूर आणि बांदा जिल्ह्यात आज मतदान होणार आहे. यात लखनऊसह रायबरेलीवरही विशेष लक्ष असेल. कारण, हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी येथून लोकसभेच्या खासदार आहेत. यासोबतच चौथ्या टप्प्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या निवडणूक रणनीतीचीही चाचपणी केली जाणार आहे.

06:41 February 23

Uttar Pradesh Phase 4 Updates : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.45 टक्के मतदान

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 7 टप्प्यात ( Uttar Pradesh Assembly elections 2022 ) मतदान होत आहे. आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 5.45 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान लखीमपूरमध्ये झाले आहे.

अनुक्रमे 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च 2022 रोजी मतदान आयोजित आहे. तर 10 मार्च 2022 रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण 404 जागा आहेत. यात 403 जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा 202 इतका आहे.

पहिला टप्पा -

पहिला टप्पा 10 तारखेला पार पडला ( UP Election 2022 Phase 1 ) होता. पहिल्या टप्प्यात शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, हापूर, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 2.27 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजाविला आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात आहेत. यात 73 महिला आहेत. तर 2.27 कोटी मतदार आहेत.

दुसरा टप्पा -

दुसरा टप्पा 14 फेब्रुवरीला पार पडला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या 9 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान झाले.

तिसरा टप्पा -

उत्तर प्रदेशात 20 फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 59 जागांसाठी मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम यूपीतील फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, कासगंज आणि हाथरस या 5 जिल्ह्यांत मतदान झाले. झाशी, जालौन, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा जिल्ह्यात बुंदेलखंड प्रदेशात विधानसभेच्या 13 जागा आहेत. याशिवाय अवध प्रदेशातील कानपूर, कानपूर देहाट, औरैया, फर्रुखाबाद, कन्नौज आणि इटावा या 27 विधानसभा जागांवर मतदान झाले आहे. या तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तिसऱ्या टप्प्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री प्राध्यापक एसपी सिंह बघेल आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आमने-सामने होते.

हेही वाचा -Uttar Pradesh Elections Live Updates : युपीत निवडणुकांचा दुसरा टप्पा, दिवसभरात 60.44 टक्के मतदान वाचा प्रत्येक क्षणाचे अपडेट

Last Updated : Feb 23, 2022, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details