सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.31 टक्के मतदान झाले आहे. अंबेडकरनगरमध्ये सर्वाधिक मतदान तर सर्वात कमी मतदान हे बलरामपूरमध्ये झाले आहे.
Uttar Pradesh Phase 6 Updates : युपीत विधानसभा निवडणुकीचा सहावा टप्पा, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.31 टक्के मतदान - UP Assembly elections 2022 LIVE
यूपी विधानसभा चुनाव के छठवें चरण के चुनाव दस जिलों की 57 सीटों पर हो रहे हैं. चलिए जानते हैं इस बार के चुनाव के बाहुबलियों, करोड़पतियों समेत अन्य खास जानकारियों के बारे में.
18:31 March 03
सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.31 टक्के मतदान
13:42 March 03
दुपारी १ वाजेपर्यंत ३६.३३ टक्के मतदान
दुपारी १ वाजेपर्यंत ३६.३३ टक्के मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी आता मतदानासाठी मोठ्या रांगा दिसून येत आहे.
13:08 March 03
2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान आकडेवारीत बस्ती आघाडीवर तर बलरामपूर मागे आहे.
11:59 March 03
गोरखपूर मंडलातील सर्व 9 जागा आम्ही जिंकू - रवी किशन
गोरखपूर मंडलातील सर्व 9 जागा आम्ही जिंकू. पूर्वांचल प्रदेशात मतदान ऐतिहासिक ठरणार आहे. भाजपला 300 च्या वर जागा मिळतील. राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. आता, यूपीच्या लोकांनी येथे 'रामराज्य' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन यांनी म्हटलं.
11:56 March 03
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 21.79 टक्के मतदान झाले आहे.
10:14 March 03
भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी बलिया येथे विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान केले.
10:14 March 03
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.69 % मतदान झाले.
10:13 March 03
सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी बलिया येथे विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान केले.
08:30 March 03
उत्तर प्रदेशचे मंत्री आनंद स्वरूप शुक्ला हे बलिया येथून निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
08:29 March 03
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप विक्रम करेल आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात जागा जिंकेल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
08:16 March 03
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मतदान केल्यानंतरचा व्हिडिओ...
07:14 March 03
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदान केले.
07:12 March 03
योगी आदित्यनाथ यांच्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा
आज सहाव्या टप्प्यात गोरखपूरमध्ये मतदान होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून निवडणूक लढवत आहेत. पाच वेळा गोरखपूर मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर त्यांनी विधान परिषदेवर जाण्याला पसंती दिली होती. गोरखपूर शहराव्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दयाशंकर सिंह बलिया सदर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. दयाशंकर माजी मंत्री नारद राय यांच्याशी लढत आहेत. योगी सरकारचे मंत्री उपेंद्र तिवारी, आनंदस्वरूप शुक्ला, सूर्य प्रताप शाही, स्वामी प्रसाद मौर्य आणि शलभ मणि त्रिपाठी यांच्या भवितव्याचाही या टप्प्यात निर्णय होणार आहे.
06:46 March 03
Uttar Pradesh Phase 6 Updates : आज योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य ठरणार
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 7 टप्प्यात ( Uttar Pradesh Assembly elections 2022 ) मतदान होत आहे. आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. अनुक्रमे 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च 2022 रोजी मतदान आयोजित आहे. तर 10 मार्च 2022 रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण 404 जागा आहेत. यात 403 जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा 202 इतका आहे.
पहिला टप्पा -
पहिला टप्पा 10 तारखेला पार पडला ( UP Election 2022 Phase 1 ) होता. पहिल्या टप्प्यात शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, हापूर, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथे मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात 2.27 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात होते. यात 73 महिला होत्या. 2.27 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दुसरा टप्पा -
दुसरा टप्पा 14 फेब्रुवरीला पार पडला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांमध्ये मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या 9 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 जागांसाठी मतदान झाले.
तिसरा टप्पा -
उत्तर प्रदेशात 20 फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 59 जागांसाठी मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम यूपीतील फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, कासगंज आणि हाथरस या 5 जिल्ह्यांत मतदान झाले. झाशी, जालौन, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा जिल्ह्यात बुंदेलखंड प्रदेशात विधानसभेच्या 13 जागा आहेत. याशिवाय अवध प्रदेशातील कानपूर, कानपूर देहाट, औरैया, फर्रुखाबाद, कन्नौज आणि इटावा या 27 विधानसभा जागांवर मतदान झाले आहे. या तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तिसऱ्या टप्प्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री प्राध्यापक एसपी सिंह बघेल आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आमने-सामने होते.
चौथा टप्पा -
चौथ्या टप्प्यात (UP 4th phase election) 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान झाले आहे. यामध्ये रोहिलखंड ते तराई बेल्ट आणि अवध प्रदेशापर्यंत 624 उमेदवार रिंगणात होते. रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनौ, उन्नाव, फतेहपूर आणि बांदा जिल्ह्यात मतदान झाले. यात लखनऊसह रायबरेलीवरही विशेष लक्ष होते. कारण, हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी येथून लोकसभेच्या खासदार आहेत. यासोबतच चौथ्या टप्प्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या निवडणूक रणनीतीचीही चाचपणी केली जात आहे.
पाचवा टप्पा -
उत्तरप्रदेशच्या पाचव्या टप्प्यासाठी 27 फेब्रुवारीला मतदान झाले. 12 जिल्ह्यांतील 61 विधानसभा मतदारसंघात 692 उमेदवार रिंगणात उतरले होते. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मंत्री सिद्धार्थनाथ सिंह, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा आणि इतरांचे भवितव्य येत्या 10 मार्चला ठरणार आहे. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 61 विधानसभा मतदारसंघात 693 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 90 महिला उमेदवार आहेत. अजय कुमार शुक्ला यांच्या मते, मतदानात 2.25 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावला. ज्यामध्ये 1.20 कोटी पुरुष, 1.05 कोटी महिला आणि 1 हजार 727 तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) मतदार आहेत. तसेच निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण 25,995 मतदान केंद्रे आणि 14030 मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती.
सहावा टप्पा -
आज 3 मार्चला उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा सहावा टप्पा पार पडणार आहे. सहाव्या टप्प्यात 10 जिल्ह्यातील एकूण 57 जागांसाठी मतदान होणार असून, 676 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपासाठी हा टप्पा निर्णायक आहे. कारण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य या टप्प्यात ठरणार आहे. सहाव्या टप्प्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कर्मभूमी असलेल्या गोरखपूरसह, आंबेडकर नगर, बलरामपूर, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीरनगर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया आणि बलिया जिल्ह्यात मतदान आज होत आहे. गोरखपूर जिल्ह्यातील 9, आंबेडकर नगर जिल्ह्यातील 5, बलरामपूर जिल्ह्यातील 4 आणि सिद्धार्थनगर जिल्ह्यातील 5 विधानसभा, बस्ती जिल्ह्यातील 5, संत कबीरनगरमधील 3, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया आणि बलिया जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा हक्क बजावतील. मतदानासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस आणि होमगार्डसोबतच निमलष्करी दलाचे जवानही मतदान केंद्रांवर सुरक्षेसाठी तैनात आहेत.