उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत 60.44 टक्के मतदान झाले आहे.
Uttar Pradesh Elections Live Updates : युपीत निवडणुकांचा दुसरा टप्पा, दिवसभरात 60.44 टक्के मतदान वाचा प्रत्येक क्षणाचे अपडेट - UP Election 2022 Phase 2 Voting
22:24 February 14
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत 60.44 टक्के मतदान
17:43 February 14
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान झाले आहे.
16:11 February 14
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत दुपारी तीन वाजेपर्यंत 51.9 टक्के मतदान
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत दुपारी तीन वाजेपर्यंत 51.9 टक्के मतदान झाले आहे.
13:52 February 14
दुपारी 1 वाजेपर्यंत 39.07 टक्के मतदान
12:28 February 14
उत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान सुरु आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 23.03 टक्के मतदान झाले आहे.
12:26 February 14
विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मुरादाबादमध्ये ड्रोनच्या मदतीने पाळत ठेवली जात आहे.
11:32 February 14
थंडी असतानाही सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची रांग
09:52 February 14
उत्तर प्रदेशात सकाळी 9 वाजेपर्यंत 9.45 टक्के मतदान
09:48 February 14
सर्व मतदान केंद्रांवर पोलीस उपलब्ध आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात कोणतीही घटना घडणार नाही, असे सहारनपूरचे डीआयजी प्रीतींदर सिंग यांनी सांगितले.
09:45 February 14
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वींचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
09:44 February 14
उत्तर प्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद यांनी शाहजहांपूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. #UttarPradeshElections च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज 55 विधानसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.
08:12 February 14
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी रामपूरमधील मतदान केंद्रावर रांगेत उभे असल्याचे दिसून आले.
07:38 February 14
यूपीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांसाठी मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. आज दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या 9 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 जागांसाठी मतदान होणार आहे.
07:33 February 14
Uttar Pradesh Elections Live Updates : युपीत निवडणुकांचा आज दुसरा टप्पा, दिवसभरात 5 वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण 7 टप्प्यात होत असून दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे. अनुक्रमे 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च 2022 रोजी मतदान आयोजित आहे. तर 10 मार्च 2022 रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण 404 जागा आहेत. यात 403 जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा 202 इतका आहे.
पहिला टप्पा -
पहिला टप्पा 10 तारखेला पार पडला ( UP Election 2022 Phase 1 ) होता. पहिल्या टप्प्यात शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, हापूर, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 2.27 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजाविला आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात आहेत. यात 73 महिला आहेत. तर 2.27 कोटी मतदार आहेत.