इटावा (उत्तरप्रदेश) - देशात पाच राज्यातील निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. काही राज्यात मतदान झाले आहे तर काही राज्यात मतदान सुरू आहे. दोन टप्प्यातील मतदानानंतर उत्तर प्रदेशात मात्र प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात तीव्र झाल्याची ( Uttar Pradesh Assembly Election On campaign ) दिसत आहे. त्यातच आता उत्तरप्रदेशमधील इटावामधून एक मनोरंजक चित्र समोर आले आहे. या ठिकाणी पाच वर्षात पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव, त्यांचे वडील मुलायम सिंह यादव आणि त्यांचे काका शिवपाल सिंह यादव ( Akhilesh Mulayam Shivpal spotted together ) हे एकत्र दिसले ( UP Election campaign SP ) आहेत.
यापूर्वी 2016 मध्ये दिसले होते एकत्र -
2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लखनौमध्ये "समाजवादी विकास रथ" ला झेंडा दाखवण्यासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये या तिघांना सार्वजनिकरित्या एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर हे तिघेही कौटुंबिक वादातून वेगळे झाले होते. 2016 मध्ये कौटुंबिक वादामुळे अखिलेश यांनी काका शिवपाल यांना समाजवादी पक्षाचा बाहेरचा दरवाजा दाखवला होता. शिवपाल यांनी पुढे प्रगतीशील समाजवादी पक्ष (लोहिया) स्थापन केला. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पीएसपीला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही.
भाजप सरकार संपवण्यासाठी हात मिळवणी -
शिवपाल सिंह यादव यांचा पक्ष आता अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या युतीमध्ये सहभागी आहे. अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील मतभेद गेल्या वर्षी अधिकृतपणे संपुष्टात आले होते. कारण त्यांनी राज्यातील भाजप सरकार हटवण्यासाठी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर हे दोन्ही नेते कधीही एकत्र स्टेज शेअर करताना दिसले नाहीत.
पुनरागमनामुळे आमची शक्ती मजबूत होईल -