महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Election Result 2022 : उत्तरप्रदेशात पुन्हा 'योगी'राज; बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचा आभारी - योगी आदित्यनाथ - up election result 2022 live news

बहुमताने विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी
बहुमताने विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी

By

Published : Mar 10, 2022, 6:26 AM IST

Updated : Mar 16, 2022, 9:10 AM IST

18:30 March 10

बहुमताने विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी - योगी आदित्यनाथ

सर्वांच्या नजरा यूपीकडे होत्या. आम्हाला बहुमताने विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही यूपी, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करणार आहोत, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेश जिंकल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

17:26 March 10

करहल मतदारसंघातून अखिलेश यादव विजयी

करहल मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव विजयी झाले आहेत. भाजपच्या एसपी सिंह बघेल यांचा त्यांनी पराभव केला आहे.

16:38 March 10

गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी

गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी नेते उमेंद्र शुक्ला यांच्या पत्नी शुभावती शुक्ला यांना समाजवादी पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली होती. 19 मार्च 2017 रोजी योगींनी यूपीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगी आदित्यनाथ यांनी 1998 साली वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी लोकसभा निवडणूक जिंकून खासदार म्हणून शपथ घेतली. योगी आदित्यनाथ यांचा जन्म 05 जून 1972 रोजी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात एका गढवाली क्षत्रिय कुटुंबात झाला.

15:35 March 10

यूपी विधानसभेसमोर सपा कार्यकर्त्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

यूपी विधानसभा समोर सपा कार्यकर्त्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

कन्नौजमध्ये सपा-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक

15:04 March 10

विजयी उमेदवारांची नावे

फतेहाबाद विधानसभा-28 भाजपचे उमेदवार विजयी

निघासन- शशांक वर्मा (बीजेपी) विजयी

हरविंदर कुमार साहनी (बीजेपी) विजयी

श्रीनगर- मंजू त्यागी (बीजेपी) विजयी

तिंदवारी- रामकेश निषाद (बीजेपी) विजयी

गोवर्धन - मेघश्याम (बीजेपी) विजयी

बरेली मीरगंज विधानसभा - बीजेपी उमेदवार डॉ. डीसी वर्मा विजयी

14:13 March 10

दोन निकाल हाती; भाजपचे उमेदवार विजयी

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (UP Election Result 2022) मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यातला पहिला निकाल जाहीर झाला आहे. सीतापूरमधील हरगाव विधानसभेचे भाजप उमेदवार सुरेश राही विजयी (Suresh Rahi win) झाले आहेत. दुसरा निकाल देखील हाती आला असून, यात पीलीभीतमधून भाजपचे स्वामी प्रवक्ता नंद विजयी झाले आहेत.

13:17 March 10

उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांसाठी अधिकृत कल हाती

उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांसाठी अधिकृत कल हाती आले आहेत. यात भाजप 258 मतदारसंघात आघाडीवर, तर समाजवादी पक्ष 112 मतदारसंघात आघाडीवर आहे. यासंदर्भातली माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

13:07 March 10

गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ 34 हजार मतांनी आघाडीवर

गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ 34 हजार मतांनी आघाडीवर

रामपूरमधून सपा नेते आझम खान 41 हजार मतांनी आघाडीवर

मेरठ शहरमधून सपाचे रफीक अंसारी 13 हजार मतांनी आघाडीवर

लखीमपूरमधील आठ जागांवार भाजपचे उमेदवार आघा़डीवर

कन्नौजमध्ये भाजपा-सपा कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी; पोलीस फौजफाटा तयार

12:09 March 10

लखनौमधील भाजप पक्ष कार्यालयात जल्लोष

लखनौमधील भाजप पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. "यूपी में का बा? यूपी में बाबा" असे नारे कार्यकर्त्यांकडून लावले जात आहेत. ताज्या ट्रेंडनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर अर्बनमधून 12,000 मतांनी आघाडीवर आहेत.

11:48 March 10

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार

भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 200 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 89 जागांवर आघाडी मिळाली. अपना दल 8 जागांवर, बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल ४ जागा, राष्ट्रीय लोक दल 6 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 2 जागेवर आघाडीवर आहे.

10:56 March 10

योगी आदित्यनाथ आघाडीवर...सकाळी 11 वाजेपर्यंतचे कल

भाजप - 255

सपा - 125

बसपा - 7

काँग्रेस - 2

इतर - 14

10:37 March 10

उत्तरप्रदेशच्या 403 जागांचे कल हाती; भाजप 260, सपा 135

उत्तरप्रदेशच्या 403 जागांचे कल हाती; भाजप 260, सपा 135

10:29 March 10

सकाळी साडेदहा वाजेपर्यंतचे कल

भाजप - 245

सपा - 133

बसपा - 7

काँग्रेस - 4

इतर - 9

10:02 March 10

उत्तरप्रदेशात सुरळीतपणे मतमोजणी सुरू - गृह विभाग मुख्य सचिव

उत्तरप्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ECI च्या निर्देशानुसार, मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे होत आहे आणि अधिकारी सर्व मतदारसंघात पारदर्शक मतमोजणी प्रक्रिया सुनिश्चित करत आहेत : अवनीश अवस्थी, अतिरिक्त. मुख्य सचिव, गृह विभाग, यूपी

09:54 March 10

करहलमधून अखिलेश यादव आघाडीवर

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक - करहल विधानसभेच्या जागेवर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आघाडीवर आहेत, तर बसपा आणि भाजप अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

09:47 March 10

जसवंतनगरमधून शिवपाल सिंह यादव आघाडीवर

यूपीच्या जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून शिवपाल सिंह यादव यांनी कमबॅक केलं आहे. शिवपाल यादव सुरुवातीला पिछाडीवर होते.

भाजप - 203

सपा - 111

बसपा - 8

काँग्रेस - 5

इतर - 6

09:32 March 10

BJP चे शलभमणी त्रिपाठी आघाडीवर; जाणून घ्या कल

भाजप - 168

सपा - 97

बसपा - 7

काँग्रेस - 3

इतर - 4

09:14 March 10

यूपीत भाजपचे महत्त्वाचे नेते आघाडीवर

सिराथूचे मतदारसंघातून भाजपचे केशवप्रसाद मौर्य पिछाडीवर

अखिलेश यादव आघाडीवर

योगी आदित्यानाथ आघाडीवर

शिवपाल सिंह यादव पिछाडीवर

सिराथूचे मतदारसंघातून भाजपचे केशवप्रसाद मौर्य पिछाडीवर

09:00 March 10

इम्तिहान बाकी है अभी हौसलों का - अखिलेश यादव

अखिलेश यादव यांनी सूचक ट्विट केले आहे.

08:56 March 10

आदिती सिंह या रायबरेलीमधून आघाडीवर, तर शिवपाल सिंहदेखील पुढे

आदिती सिंह या रायबरेलीमधून आघाडीवर. तसेच शिवपाल सिंह यादव देखील आघाडीवर आहेत. सध्या पहिले कल येण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पोस्टलची मतमोजणी झाली असून, आता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू झाली आहे.

08:43 March 10

योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव आघाडीवर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर ग्रामीणमधून आघाडीवर आहेत. तर अखिलेश यादव देखील आघाडीवर आहेत.

08:35 March 10

उत्तरप्रदेशात भाजप 70 जागांवर, सपा 45 जागांवर आघाडीवर

भाजप 70 जागांवर तर सपा 45 जागांवर आघाडीवर, बसपा 3 तर काँग्रेस 2 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.

08:21 March 10

मतमोजणी पारदर्शक पद्धतीने - मुख्य निवडणूक आयुक्त चंद्रा

मतमोजणी ही पारदर्शक प्रक्रिया आहे. एक मानक कार्यप्रणाली आहे ज्या अंतर्गत आम्ही मोजणी करतो. राजकीय पक्षांच्या अधिकृत पोलिंग एजंटना मतमोजणी केंद्रात येण्याची परवानगी आहे - सुशील चंद्रा, मुख्य निवडणूक आयुक्त

08:16 March 10

मतमोजणीला सुरुवात झाली

मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ईटीव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी सध्या सुरू झाली आहे.

07:45 March 10

मतमोजणीपूर्वी देवाला साकडे

मतमोजणीपूर्वी देवाला साकडे

06:36 March 10

8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात.... उत्तर प्रदेशमधील 2017 ची परिस्थिती

२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने 325 जागांवर घवघवीत यश प्राप्त करत सत्ता स्थापन केली होती. भाजपाला निवडणुकीत एकूण ३९.६७ टक्के मते मिळाली होती. तर समाजवादी पक्षाने ४७ आणि बहुजन समाज पक्षाने १९ जागांवर विजय प्राप्त केला होता. काँग्रेसला केवळ सात जागाच प्राप्त झाल्या होत्या.

06:35 March 10

बहुमताचा आकडा 202 -

बहुमताचा आकडा 202 -

उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. उत्तर प्रदेशात ४०४ विधानसभा आणि विधान परिषदेत १०० सदस्य आहेत. उत्तर प्रदेशात सध्या भाजपाचे सरकार आहे. तर मुख्य विरोधी पक्षात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा समावेश आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०४ सदस्यांमध्ये ४०३ निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

06:13 March 10

यूपीचा कौल कुणाला? मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

लखनौ :उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Assembly Election Result 2022),उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले. आज (10 मार्च) या राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागले आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.

आज लागणार निकाल

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने (BJP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष (SP) आणि आरएलडीने निवडणूक लढवली. मायावती यांनी बसपाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तर, काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्त्व प्रियांका गांधी यांनी केले. उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहावे लागणार आहे. भाजप, समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बसपा यांच्यापैकी कोणाची सत्ता येणार हे आज स्पष्ट होणार आहे.

कोणत्या टप्यात किती झालं मतदान?

पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी 65.58 टक्के मतदान

दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी 64.77 टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी रोजी 61.61 टक्के मतदान

चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी रोजी 59.77 टक्के मतदान

पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी रोजी 55.15 टक्के मतदान

सहाव्या टप्प्यात 3 मार्च रोजी 55.70 टक्के मतदान

सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी 54.18 टक्के मतदान

खालील लढतींकडे असणार खास लक्ष -

भाजप -

1) योगी आदित्यनाथ - योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी नेते उमेंद्र शुक्ला यांच्या पत्नी शुभावती शुक्ला यांना समाजवादी पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली. 19 मार्च 2017 रोजी योगींनी यूपीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगी आदित्यनाथ यांनी 1998 साली वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी लोकसभा निवडणूक जिंकून खासदार म्हणून शपथ घेतली. योगी आदित्यनाथ यांचा जन्म 05 जून 1972 रोजी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात एका गढवाली क्षत्रिय कुटुंबात झाला.

2) केशव प्रसाद मौर्य : कौशांबी जिल्ह्यातील सिरथू विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात सपाकडून पल्लवी पटेल आणि बसपाकडून मुंसब अली उस्मानी यांना उमेदवारी दिली. केशव प्रसाद मौर्य हा आरएसएस-भाजपचा मौर्य चेहरा आहे. केशव प्रसाद मौर्य हा भाजपसाठी ओबीसी मतांचा वापर करण्यासाठी मोठा चेहरा मानला जातो. सुरुवातीच्या काळात केशव प्रसाद मौर्य हे आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित होते.

3) सिद्धार्थनाथ सिंह: सिद्धार्थनाथ सिंह हे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आहेत. सिद्धार्थनाथ सिंह हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. सिद्धार्थनाथ सिंह हे अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात सपाचे अमरनाथ मौर्या रिंगणात आहेत.

4) श्रीकांत शर्मा : ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा हे मथुरा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आहेत. कृषी कायदे आणि जाट आंदोलनाचा परिणाम या मतदारसंघावर आहे. शर्मा यांच्याविरोधात सपाचे देवेंद्र अग्रवाल आणि बसपाचे एस के शर्मा रिंगणात आहेत. श्रीकांत शर्मा यांना राजकारणात येण्यापूर्वी क्रिकेटपटू व्हायचे होते. परंतु, काळाच्या ओघात त्यांची सामाजिक आणि राजकीय बाबींमध्ये रस वाढत गेला. शिक्षणादरम्यान ते राजकारणाकडे वळले आणि अभाविपमध्ये सामील झाले.

5) राजेश्वर सिंह : भाजपने लखनौच्या सरोजिनीनगर मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तिकीट दिले आहे. राजेश्वर सिंह हे ईडीचे माजी सहसंचालक राहिले आहेत. अलीकडेच त्यांनी सेवेतून निवृत्ती घेतली आणि ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 24 तासांच्या आतच त्यांना विधानसभेचे तिकीट जाहीर करण्यात आले.

समाजवादी पार्टी -

1) अखिलेश यादव : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री कार्यकाळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. अखिलेश यादव यांचा मुकाबला भाजप नेते व केंद्रीय मंत्री एसपी सिंग बघेल यांच्याशी होत आहे. अखिलेश यादव हे 2000 ते 2012 पर्यंत कन्नोजचे खासदार होते तर 2012 ते 2017 मध्ये ते आजमगडमधून खासदार राहिले. अखिलेश यादव 2012 ते 2017 पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. उत्तर प्रदेशच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. अखिलेश यादव यांचा जन्म 01 जुलै 1973 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. ते समाजवादी पक्षाचे सरदार आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आहेत.

2) शिवपाल सिंह यादव : शिवपाल सिंह यादव हे इटावा जिल्ह्यातील जसवंत नगर विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा सपाचे उमेदवार आहेत. समाजवादी पक्षाच्या कुटुंबातील भांडणानंतर त्यांनी 2018 मध्ये प्रगतीशील समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. मात्र, 2022 विधानसभा निवडणुकीच्या आधीच त्यांना त्यांचा नवीन पक्ष सपामध्ये विलीन केला आहे. शिवपाल सिंह यादव हे मुलायम सिंह यादव यांचे लहान भाऊ आहेत.

3) अब्दुल्ला आजम खान : समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांचे अब्दुल्ला आजम खान हे पुत्र आहेत. 2017 मध्ये ते स्वार विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. मात्र, जन्म दाखला प्रमाणपत्र प्रकरणामुळे हायकोर्टने त्यांची विधानसभा सदस्यता रद्द केली होती. त्यांच्याविरोधात अपना दलचे चिराग हैदर अली खान रिंगणात आहेत.

काँग्रेस

1) आराधना मिश्रा : काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांची मुलगी आहे. आराधना मिश्रा "मोना" या प्रतापगडच्या रामपूर खास विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. आराधना मिश्रा 'मोना'चा जन्म 20 एप्रिल 1974 रोजी प्रयागराज, यूपी येथे एका राजकीय कुटुंबात झाला. आराधना मिश्रा यांचे वडील प्रमोद तिवारी प्रतापगडच्या रामपूर खास मतदारसंघातून सलग 9 वेळा आमदार राहिले आहेत. त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

2) अजय राय : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय राय वाराणसीच्या पिंद्रा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पिंद्राच्या रणांगणात खेळणाऱ्या अजय राय यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षातून झाली. यानंतर ते समाजवादी पक्षात गेले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजय राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर काँग्रेस पक्षाचे लोकसभा उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली होती. मात्र, तेथे त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

बसपा

1) अमनमणी त्रिपाठी : अमनमणी त्रिपाठी महाराजगंजच्या नौतनवा विधानसभा मतदारसंघातून बसपाचे उमेदवार आहेत. 2017 च्या निवडणुकीत ते नौतनवा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे वडील बाहुबली अमरमणी त्रिपाठी हे लक्ष्मीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिले आहेत. अमरमणी त्रिपाठी हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत.

अपना दल(के)

1) कृष्णा पटेल: अपना दल (कम्युनिस्ट) पक्षाचे प्रमुख कृष्णा पटेल हे प्रतापगड जिल्ह्यातील सदर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. या निवडणुकीत कुर्मी मतदारांना सामावून घेण्यासाठी सपा आणि अपना दल (कम्युनिस्ट) यांनी युती केली आहे.

पांच राज्यांचा निकाल एका क्लिकवर..

Last Updated : Mar 16, 2022, 9:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details