पाटणा - देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असताना अनेक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पण, बिहारमधील सामाजिक कार्यकर्त्याने केवळ नाराजी व्यक्त केली नाही. तर थेट न्यायालयात धाव घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते तमन्नाह हाश्मी यांनी केंद्रीय पेट्रोलिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार केली आहे. देशात इंधनाचे दर वाढत असल्याने ही तक्रार हाश्मी यांनी नोंदविली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात कलमांनुसार २९५ ए, २९५ए, ५११ आणि ४२० तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मुझ्झफरपूर सीजीएम न्यायालयात ताखल करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते तम्मनाह हाश्मी यांनी सांगितले.
हेही वाचा-वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!
सध्या, पेट्रोलियम मंत्रालयाकडून पेट्रोल आणि डिझेल कमी दराने विदेशातून खरेदी करत आहे. मात्र, अधिक किमतीने जनतेला विकत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून घेतलेल्या किमतीच्या दुप्पट दराने सरकार इंधन विक्री करत असल्याचे हाश्मी यांनी म्हटले आहे.