महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Girl Suicide in Lucknow: ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलीला आई रागावली.. मुलीने केली आत्महत्या..

दिवसेंदिवस लहान मुलांमध्ये मोबाईल आणि ऑनलाईन गेमचे व्यसन वाढत चालले आहे. अशाच एका घटनेत लखनऊमध्ये ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलीला आईने रागावले. त्यामुळे नाराज झालेल्या दहा वर्षीय शाळकरी मुलीने घरातच आत्महत्या केली.

Uttar Pradesh 10-year-old girl allegedly commits suicide when her parents forcefully took away a mobile phone from her
ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलीला आई रागावली.. मुलीने केली आत्महत्या..

By

Published : Jan 18, 2023, 7:40 PM IST

लखनौ (उत्तरप्रदेश): आईने दहा वर्षांच्या मुलीला ऑनलाइन गेम खेळण्यास मनाई केल्यावर तिला त्याचा राग आला. रागाच्या भरात लहान मुलीने मोबाईल ठेऊन देत खोली बंद केली. थोड्या वेळाने आई कामासाठी घराबाहेर गेली. आई घरात परत आल्यावर तिला धक्काच बसला. कारण दार बंद करून बसलेल्या लहान मुलीने आत्महत्या केली होती. मुलीच्या आईने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

अन् मुलीने दिला जीव: आई नीतूने सांगितले की, मुलगी हर्षिता बाजपेयीला अभ्यासात रस नव्हता. यामुळे ती अनेकदा गोंधळ घालायची. मुलगी मंगळवारी ऑनलाइन गेम खेळत होती. याबाबत त्यांनी मुलीला फटकारले. रागाच्या भरात तिने मोबाईल सोडून स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर आई कामावर निघून गेली. कामावरून परतल्यावर आपल्या मुलीचा मृतदेह तिला फासावर लटकलेला दिसला. हे बघून आईच्या संवेदनाच उडून गेल्या. आईने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीची झडती घेतली. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा: दुसरीकडे, स्टेशन प्रभारी पारा तेज बहादूर सिंह यांनी सांगितले की, 10 वर्षांची हर्षिता बाजपेयी तिची आई नीतूसोबत बलदेव खेडा येथे राहत होती. आईने मुलीला ऑनलाइन गेम सोडून अभ्यास करण्यास खडसावले. यामुळे तिला खूप राग आला. रागाच्या भरात त्याने जीव दिला होता. हर्षिताचे वडील मनीष यांचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले होते. आई लोकांच्या घरी काम करून कुटुंबाचा खर्च भागवते. माहितीवरून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळाचीही चौकशी करण्यात आली आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

मध्यप्रदेशात मुलगा गेला होता घर सोडून:मध्यंतरी असाच एक प्रकार मध्यप्रदेशातून समोर आला होता. कोरोनाच्या काळापासून मुले मोबाईलचा इतका वापर करू लागली आहेत की त्यांची ही सवय झाली आहे. सोशल साइट्सच्या वापराच्या व्यसनामुळे मानसिक आजारी पडू लागली आहेत. सोशल नेटवर्किंग साइट्स आणि ऑनलाइन गेम्सच्या दुष्परिणामांची अनेक प्रकरणे समोर येत राहतात. तसेच ऑनलाइन गेमने अनेक मुलांना गुन्हेगार बनवले आहे. त्याचे दुष्परिणाम उज्जैनमधून समोर आले आहेत. जिथे गेम खेळायला आईने नकार दिला म्हणून मुलाने नाराज होऊन घर सोडले आणि मुंबई शहराचा रस्ता धरला होता.

तरुणाला ठेवले हतोय बांधून:असेच एक प्रकरण राजस्थानच्या चित्तौडगड जिल्ह्यातील बनसेनमध्ये पाहायला मिळाले होता. येथे ऑनलाइन गेमचे व्यसन लागलेल्या एका तरुणाने मानसिकदृष्ट्या खचल्यासारखे वर्तन सुरू केले होते. 'हॅकर-हॅकर', 'पासवर्ड चेंज' वगैरे म्हणत तो रस्त्यावर धावत होता. तरूणाला दोरीने बांधून ठेवण्याची वेळ तेथील लोकांवर आली होती. त्यामुळे ऑनलाईन गेमपासून लहान मुलांना दूरच ठेवण्याची गरज आता व्यक्त होत आहे.

हेही वाचा: ऑनलाईन गेम खेळून मानसिक परिस्थिती बिघडली.. 'हॅकर पासवर्ड चेंज' म्हणत रस्त्यावर फिरत होता तरुण.. उपचार सुरु

ABOUT THE AUTHOR

...view details