नडियाद (गुजरात) -गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. (Gujrat Election 2022). सर्व उमेदवार आपापल्या प्रचारात व्यस्त आहेत. अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी अनोख्या पद्धतीचा अवलंब केला आहे. नडियादचेभाजपचे उमेदवार पंकज देसाई (Pankaj Desai BJP) यांनी निवडणूक प्रचारात चक्क डिजिटल रोबोट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. (robot in gujrat election campaign). निवडणूक प्रचार करणारा रोबोट पाहून सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Robot In Election Campaign : गुजरात निवडणुकीत प्रचारासाठी चक्क रोबोटचा वापर! - use of robot in Gujrat Election 2022
गुजरात विधानसभा निवडणूकीत (Gujrat Election 2022) प्रचाराच्या नवनवीन पद्धती पाहायला मिळत आहेत. खेडा जिल्ह्यातील नडियाद विधानसभा सीटवरील भाजप उमेदवार पंकज देसाई (Pankaj Desai BJP) यांच्या निवडणूक प्रचारात डिजिटल रोबोट तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येतो आहे. (robot in gujrat election campaign).
भाजप आयटी सेलने तयार केला रोबोट -नडियाद विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पंकजभाई देसाई सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यावेळी ते प्रचारासाठी विविध आधुनिक तंत्रांचा अवलंब करत आहेत. यामध्ये विविध उपक्रमांची माहिती देणारे पॅम्प्लेटचे वाटप करण्यात येत आहे. याबाबत पंकज पटेल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी मोहिमेत रोबोटचा वापर करत असल्याचे सांगितले. भाजप आयटी सेल सेंट्रल झोनच्या अध्यक्षांनी हा रोबोट तयार केला आहे .
डिजिटल इंडियाचे स्वप्न - सध्याच्या डिजिटल युगात निवडणूक प्रचारही हायटेक होत आहे. आधी सोशल मीडिया आणि आता हायटेक तंत्रज्ञानाने बनवलेला डिजिटल रोबोटने प्रचाराचा नवा प्रयोग नडियाद विधानसभेत सुरू झाला आहे. नडियाद विधानसभेत हा रोबोटिक प्रचार खूप लोकप्रिय होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत डिजिटल इंडियाबद्दल बोलत असतात. त्यामुळे आता तंत्रज्ञान गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील याचा वापरण्यात येतो आहे.