नवी दिल्ली - आज जगभरात दिवाळीचा उत्साह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस तसेच यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कमला हॅरिस यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा -
दिवाळी हा दिव्यांचा सण असून, हा सण साजरा करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, असे ट्विट करत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी दिवाळीच्या शुभेच्या दिल्या आहेत. तसेच जो बायडेन यांनीही ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाच्या कठीण काळानंतर मला आशा आहे की ही दिवाळी खरोखरच खास असेल. दिवाळीचा काळ कुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र येण्याचा आहे. जेव्हा आपण गेल्या नोव्हेंबरचा विचार करतो तेव्हा आपण खूप पुढे आलो आहोत यात शंका नाही, असे ट्वीट करत यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.