महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Joe Biden Vs Putin : रशियाचे युद्ध हे 'नरसंहार! पुतीन युद्ध गुन्हेगार असल्याचा बायडेन यांचा घणाघात - युक्रेन रशिया युद्धाच्या बातम्या

युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा नागरिकांवर झालेल्या विनाशकारी परिणामांदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर चांगलाच घणाघात केला आहे. "मला वाटते, की पुतिन 'युद्ध गुन्हेगार' आहेत असे ते म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

Joe Biden Vs Putin
Joe Biden Vs Putin

By

Published : Apr 13, 2022, 8:58 AM IST

नवी दिल्ली - युक्रेनमधील युद्धासाठी अमेरिका रशियावर सातत्याने आरोप करत आहे. दरम्यान, अशा कारवायांमुळे अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंधही लादले आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनमधील नरसंहारासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना जबाबदार धरले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जोरदार हमला केला आहे. ते म्हणतात रशियाचे युद्ध हे एक 'नरसंहार' आहे. होय मी याला नरसंहारच म्हणतो असे म्हणत त्यांनी पुतिन यांना युक्रेन आहे ही संकल्पनाच संपवायची आहे असा गंभीर आरोपही केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा पुतीन यांच्यावर आरोप -रशिया-युक्रेन संकटाला नरसंहार घोषीत करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत का? असे विचारले असता, बायडेन म्हणाले, 'हे स्पष्ट झाले आहे की व्लादिमीर पुतिन हे युक्रेनियन असण्याची कल्पना खोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि ते असे प्रयत्न करत आहेत त्याला पुरावो आहेतच परंतु, या पुराव्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, लोकांचे मृत्यू, नुकसान, या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर गेल्या आठवड्यापेक्षा सध्याची परिस्थिती वेगळी आहे असही ते यावेली म्हणाले आहेत.

बायडेन व्लादिमीर पुतिन यांना "युद्ध गुन्हेगार" म्हणतात -युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा नागरिकांवर झालेल्या विनाशकारी परिणामांदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना "युद्ध गुन्हेगार" म्हटले आहे. "मला वाटते, की पुतिन युद्ध गुन्हेगार आहेत. बायडेन व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

व्लादिमीर पुतिन युद्ध संपवण्याच्या मूडमध्ये नाहीत - सध्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. रशियाचा उद्देश साध्य होईपर्यंत युक्रेनमधील युद्ध सुरूच राहणार असल्याचे व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट केले आहे. जेव्हा अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर सर्व प्रकारचे निर्बंध लादले आहेत त्याचवेळी व्लादिमीर पुतिन यांनी अशी टिप्पणी केली आहे. दरम्यान, या टीप्पणीवर हे राष्ट्र आणखी काही निर्बंध लादण्याची तयारी करत आहेत.

हेही वाचा -Suicide in Karnataka : पंतप्रधानांकडे तक्रार करणाऱ्या हिंदू युवा वाहिनीच्या राष्ट्रीय सचिवचा संशयास्पद मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details