महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Urinating on Tribal Man Face : धक्कादायक! आदिवासी तरुणाला मारहाण करत तोंडावर केली लघुशंका; नऊ जणांवर गुन्हा - आंध्र प्रदेश आदिवासी तरुण बातमी

आदिवासी तरुणाला मारहाण करत त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशातील ओंगोल येथे हा प्रकार (Urinating on Tribal Man Face) घडला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 19, 2023, 3:17 PM IST

आंध्र प्रदेश(ओंगोल) - तरुणाच्या अंगावर लघुशंका केल्याचा प्रकार याआधी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही घडला होता. त्यानंतर आता असाच एक प्रकार आंध्र प्रदेशातून समोर आला आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये काही लोक एका आदिवासी तरुणाला मारहाण करत असल्याचे दिसत (Urinating on Tribal Man Face) आहे. त्यातील एक तरुण आदिवासी तरुणाच्या तोंडावर लघुशंका करत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना महिनाभरापूर्वीची आहे. मोता नवीन असे पीडितेचे नाव असून, मन्ने रमांजनेय असे आरोपीचे नाव आहे. ते दोघे मित्र असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपी-पीडित तरुणामध्ये वाद - नवीन आणि रमांजनेय यांच्यात वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते. यामुळे दोघांमध्येही वैर निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित नवीनला आरोपी रामांजनेयच्या लोकांनी ओंगोलच्या किम हॉस्पिटलच्या मागे नेले होते. तिथे रामांजनेयचे आणखी काही मित्र आधीच हजर होते. यावेळी पीडित तरुणाला या सर्वांनी दारू पाजली. याचवेळी पीडित आणि आरोपी यांच्यात आणखी वाद झाला. नंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

तोंडावर केली लघुशंका - आरोपी आणि पीडित तरुणामध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी आरोपीच्या मित्रांनीही पीडित तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच आरोपीने पीडित आदिवासी तरुणाच्या तोंडावर लघुशंका केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी याबाबतचा व्हिडिओ शूट करत नंतर तो व्हायरल केला. या व्हायरल व्हिडिओनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

MP, UP मध्ये घडला होता प्रकार - मध्य प्रदेशातील सिधी येथे एका व्यक्तीवर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर लगेच काही दिवसात अशीच घटना उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात घडली होती. उत्तर प्रदेशातच काही दिवसांपूर्वी एका दलित तरुणाला मारहाण करून थुंकी चाटायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तिथेच एका आदिवासी तरुणाच्या कानात लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते.

हेही वाचा -

  1. Youth Urinated in Ear : धक्कादायक! आदिवासी तरुणाच्या कानात केली लघुशंका; व्हिडिओ व्हायरल
  2. Flight Urinating Incident : भारतीय प्रवाशाने अमेरिकन फ्लाइटमध्ये सहप्रवाशाच्या अंगावर केली लघुशंका, गुन्हा दाखल
  3. Indian Urinating In Flight : भारतीयाने केली अमेरिकन एअरलाइनच्या विमानात लघुशंका!

ABOUT THE AUTHOR

...view details