महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MP Urinating Case : आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर भाजपनेत्याने केली लघवी, पोलिसांनी आवळल्या नराधमाच्या मुसक्या - प्रवेश शुक्ला

मध्य प्रदेशातील कुबरी गावातील भाजपच्या प्रवेश शुक्ला या नेत्याने आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर लघवी केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपनेत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या आरोपी प्रवेश शुक्लावर एनएसए लावण्याचे आदेश दिले आहेत.

MP Urinating Case
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 5, 2023, 10:39 AM IST

भोपाळ :आदिवासी तरुणावर भाजप नेत्याने लघवी केल्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील कुबरी गावात घडली होती. या प्रकरणी प्रवेश शुक्ला या भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती सिद्धीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंजुलता पटले यांनी दिली. प्रवेश शुक्लाने आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर लघवी केल्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या आरोपीवर एनएसए लावण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.

पोलिसांनी अशा आवळल्या नराधमाच्या मुसक्या :सिधी जिल्ह्यातील कुबरी या गावातून आरोपी प्रवेश शुक्ला याच्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरातून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपी प्रवेश शुक्लाने इकडे तिकडे लपण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आरोपींवर एनएसए लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मध्य प्रदेश पोलीस आरोपीला पकडण्यासाठी सायंकाळपासूनच शोध घेत होते. आम्ही आरोपी प्रवेश शुक्लाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अधीक्षक अंजुलता पटले यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले एनएसए लावण्याचे आदेश :भाजपनेता प्रवेश शुक्लाने आदिवासी तरुणावर लघवी केल्याच्या प्रकरणामुळे देशभरात मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. इतकेच नाही, तर या आरोपीवर एनएसए लावण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी प्रवेश शुक्लाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 504 आणि अनुसूचित जाती जनजाती संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. हा सर्वांसाठी नैतिक धडा असावा, त्यामुळे आम्ही त्याला सोडणार नाही. आरोपीचा कोणताही धर्म नाही, जात नाही आणि पक्षही नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरोपी हा आरोपीच असतो असेही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले.

आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर लघवी : सिधी जिल्ह्यातील कुबरी गावात आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर भाजपनेत्याने लघवी केल्याचा किळसवाणा प्रकार घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी प्रवेश शुक्ला एका आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर मद्यधुंद अवस्थेत लघवी करताना दिसत आहे. प्रवेश शुक्ला हा कुबरी गावचा रहिवासी आहे, तर पीडित करौंडी गावचा रहिवासी आहे. जिल्ह्यातील बहारी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही अत्यंत निंदनीय घटना असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details