महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'यूपीएससी' ने देखील पूर्व परीक्षा ढकलली पुढे; जाणून घ्या परीक्षेची नवीन तारीख - स्पर्धा परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती. आता ती परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्पर्धा परीक्षा सतत पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थी खचले आहेत.

upsc
यूपीएससी

By

Published : May 13, 2021, 3:55 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती. आता ती परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने अनेक परीक्षा या रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षा सतत पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थी खचले आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असतात. जगभरात कोरोनाचा प्रसार झाला. कोरोनामुळे प्रत्येक घटकाचे नुकसान झाले. कोरोनामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा आला आहे.

इतर परीक्षाही पुढे ढकलल्या -

महाराष्ट्रातही वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तसेच अभियांत्रिकीची प्रवेशपूर्व परीक्षा असलेली जीईई-मेन्स कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. जीईई-मेन्स ही 24 मे ते 28 मे दरम्यान होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जीईई-मेन्स पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यालयीन आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) काढले.

हेही वाचा -कोरोनापासून बचावासाठी शेणाची अंघोळ टाळा; अघोरी उपायामुळे होऊ शकतो आणखी गंभीर आजार

ABOUT THE AUTHOR

...view details