नवी दिल्ली :२०२०मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) परीक्षा देण्याची ज्यांची शेवटची संधी होती, त्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे. २०२०मध्ये कॉमन सिव्हिल सर्व्हिस (सीएसई) परीक्षेला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही दुसरी संधी मिळणार आहे.
२०२०मध्ये परीक्षा न देता आलेल्यांना यूपीएससी देणार दुसरी संधी! - यूपीएससी बातमी
२०२०मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) परीक्षा देण्याची ज्यांची शेवटची संधी होती, त्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे.
रचना सिंह नामक एका विद्यार्थिनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिने आपल्या याचिकेत म्हटले होते, की २०२०मध्ये कोरोना महामारीमुळे कित्येक विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या परीक्षेला उपस्थित राहता आले नाही. तसेच, जे विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते, त्यांनाही आपत्कालीन परिस्थितींमुळे चांगल्या प्रकारे परीक्षा देता आली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसता यावे, अशी मागणी या विद्यार्थिनीने केली होती.
या याचिकेवर सुनावणी सुरु असताना, विद्यार्थ्यांना दुसरी संधी देण्यास यूपीएससी तयार असल्याची माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली. तसेच, वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार नसल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले. याबाबत पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.