नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC चा निकाल जाहीर झाला आहे. यात इशिता किशोरने 2022 च्या मुख्य परीक्षेत टॉप केले आहे. इशिता किशोरीने ऑल इंडिया रँकमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. यंदाही नागरी सेवा परीक्षेत महिलांनी अव्वल ३ क्रमांक पटकावले आहेत. टॉपर लिस्टवर नजर टाकली तर, इशिता किशोरने AIR 1 मिळवला आहे. यानंतर गरिमा लोहिया दुसऱ्या तर उमा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे.
येथे पहा UPSC CSE निकाल : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. मुख्यपृष्ठावर, UPSC CSE मुख्य निकाल 2022 (अंतिम) लिंकवर क्लिक करा. आता स्क्रीनवर एक PDF फाईल उघडेल. त्यात पीडीएफ फाइलमध्ये UPSC नागरी सेवा मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल 2022 असेल. यांनतर तुम्ही गुणवत्ता यादी तपासून तुमचा निकाल डाउनलोड करा.
- UPSC CSE 2022 अंतिम निकाल: हे आहेत परीक्षेतील टॉपर्स
1 इशिता किशोर, 2 गरिमा लोहिया, 3 उमा हरती एन, 4 स्मृती मिश्रा, 5 मयूर हजारिका, 6 ज्वेल नवीन जेम्स, 7 वसीम अहमद भट, 8 अनिरुद्ध यादव, 9 कनिका गोयल, 10 राहुल श्रीवास्तव, 11 परसनजीत कौर, 12 अभिनव शिवच, 13 विदुषी सिंग, 14 कृतिका गोयल, 15 स्वाती शर्मा, 16 शिशिर कुमार सिंग, 17 अविनाश कुमार आदी.
180 जणांची IAS साठी निवड :भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट 'अ' आणि गट 'ब' मध्ये नियुक्तीसाठी एकूण 933 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. शिफारस केलेल्या 933 उमेदवारांपैकी 345 सामान्य श्रेणीतील, 99 EWS, 263 OBC, 154 अनुसूचित जाती, 72 अनुसूचित जमातीचे आहेत. 178 उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. 180 जणांची IAS साठी निवड IAS पदासाठी 180 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तर 178 उमेदवारांची राखीव यादीही तयार करण्यात आली आहे.
हेही वाचा -
- PM Modi Australia Visit : पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर, ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध आणखी दृढ करणार
- Cabinet Expansion : लवकर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; भाजप - शिंदे गटातील प्रत्येकी ७-७ मंत्र्यांचा समावेश?
- Nitesh Rane in Nashik : नितेश राणे आज करणार त्र्यंबकराजांची महाआरती, राजकारण पुन्हा तापणार ?