नवी दिल्ली -संसदेचे पावसाळी अधिवेशन सतत गदारोळातून ( Uproar in parliament ) जात आहे. विरोधी पक्ष दररोज सभागृहात ( Young India office seal by ED ) गोंधळ घालत आहेत. आजही असेच काही ( Congress in parliament ) होण्याची शक्यता आहेत. ईडीकडून यंग इंडियन ऑफिस सील केल्याचा मुद्दा काँग्रेस दोन्ही सभागृहात ( Young India office ) उपस्थित करू शकते. या मुद्द्याबाबत पक्षात प्रचंड नाराजी आहे. यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने राज्यसभा आणि लोकसभेच्या आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक सकाळी ९.४५ वाजता संसदेच्या आवारात होणार आहे. काँग्रेस सदर मुद्द्यांवर स्थगितीचा प्रस्ताव आणू शकते.
हेही वाचा -Bit Coin Rate In India : बिटकॉईनच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या आजचे दर
बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ -तत्पूर्वीबुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड कार्यालयावर छापे टाकल्यानंतर काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात ईडी आणि इतर केंद्रीय एजन्सींचा गैरवापर केल्याचा आरोप करत गोंधळ घातला. त्यामुळे, दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले.