महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जातीनिहाय जनगणेवरून बिहारमध्ये राजकारण: भाजपने पक्षांतर्गत मतभेद सोडवावेत- उपेंद्र कुशवाह - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

जातीनिहाय जनगणनेवरून पंतप्रधानांवर दबाव टाकू नये, असे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सी. पी. ठाकूर यांनी म्हटले होते. दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी म्हणाले होते, की भाजप हा कधीही जातीनिहाय जनगणनेविरोधात नव्हता.

Upendra Kushwaha
उपेंद्र कुशवाह

By

Published : Aug 26, 2021, 7:22 PM IST

पाटणा-जातीनिहाय जनगणनेवरून बिहारमधील राजकारणात वातावरण तापले आहे. जातीनिहाय जनगणणेबाबत भाजपने पक्षांतर्गत मतभेद सोडवावेत, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री आणि जेडीयू संसदीय मंडळाचे चेअरमन उपेंद्र कुशवाह यांनी दिला आहे.

माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह म्हणाले, की भाजपचे अनेक नेते हे जातिनिहाय जनगणनेला पाठिंबा नसल्याचे वक्तव्य करत आहेत. या विषयावर 11 सदस्यांच्या शिष्टमंडळांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बैठक झाली होती.

हेही वाचा-कॉलेजियम शिफारशीतील तीन महिलांसह 9 न्यायाधीशांच्या बढत्यांना केंद्राकडून हिरवा कंदील

भाजपमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. काही भाजप नेते जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा देत आहेत. तर काही नेते जातिनिहाय जणगणनेविरोधात बोलत आहेत. भाजपने हे मतभेद सोडवावेत. त्यांचे विसंगत विधाने आहेत. कुशवाह म्हणाले, की डिजीटल युगात, जातीनिहाय जनगणना करण्यासाठी काही अडचणी येऊ शकतील, असे मला वाटत नाही. तुम्हाला फक्त एक अतिरिक्त कॉलम देण्याची गरज आहे. दुसरे कोण काय म्हणत आहेत, याची मला पर्वा नाही. मात्र, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश यांच्या बैठकीबाबत आशावादी आहे.

हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट संपेना; 24 तासात आढळले नवे 46,164 रुग्ण

बिहारमधील सर्वपक्षीय नेत्यांनी नुकतेच पंतप्रधानांची घेतली भेट

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विविध 10 राजकीय पक्षांची प्रतिनिधींनी 23 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीत भाजपचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे मंत्री जनक राम होते. या बैठकीनंतरही विविध भाजप नेत्यांनी जातिनिहाय जनगणनेला पाठिंबा नसल्याचे प्रसिद्धीपत्रके काढली होती. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणनेची गरज का आहे? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नितीश कुमार यांच्यासह दहा नेत्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले. जातीनिहाय जनगणना ही प्रत्येक समाजाच्या हिताची आहे. या जनगणनेमुळे इतर समाजाला चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. ही जनगणना केंद्र सरकारवर अवलंबून आहे. मात्र, आम्ही आमच्या मागण्या पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवल्या आहेत, असे या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार यांनी सांगितले होते.

हेही वाचा-मलाबार नौदल सरावात भारतासह चार देशांचा सहभाग; चीनकडून तिबेटमध्ये युद्धसराव

जातीनिहाय जनगणनेला बिहारमधील भाजपच्या नेत्यांचा विरोध-

  • विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या जनक राम यांनीदेखील जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा नसल्याचे प्रसिद्धीपत्रक काढले होते. जातिनिहाय जनगणनेशिवायही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास करणे शक्य असल्याचे जनक राम यांनी म्हटले.
  • भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कडाडून टीका केली होती. जनगणना हा राजकारण करण्यासाठी नव्हे तर समाजाच्या हिताचा विषय असायला हवा, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले होते.
  • जातीनिहाय जनगणनेवरून पंतप्रधानांवर दबाव टाकू नये, असे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सी. पी. ठाकूर यांनी म्हटले होते.
  • दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी म्हणाले होते, की भाजप हा कधीही जातीनिहाय जनगणनेविरोधात नव्हता.
  • जातीनिहाय जनगणनेचा चेंडू हा पंतप्रधानांच्या कोर्टात असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वक्तव्य केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी संसदीय अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details