लखनौ -उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर येथील खासगी शाळेच्या दोन व्यवस्थापकांवर 17 मुलींवर बलात्काराचा प्रयत्न ( School Managers Assaulted 17 Girls ) केल्याच्या आरोपाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणाचे ईटीव्ही भारतने वृत्त दिल्यानंतर मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
ईटीव्ही भारतच्या वृत्ताची ( ETV Bharat report on sexual abuse case ) दखल घेतल उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने ( Womens commission of Uttar Pradesh ) मुझफरनगर जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले आहे. या प्रकरणाती सर्व माहिती लवकरात लवकर महिला आयोगाला द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे. पोलिसांनी कारवाई करण्यात कुचराई केल्याचा आरोप होत आहे. भाजप आमदाराने दबाव टाकल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी माहिती घेऊन कारवाई केली आहे.
हेही वाचा-गोव्यात राजकीय घडामोडींना वेग; भाजपची उमेदवार निश्चितीसाठी लगबग तर तृणमूल 'मगो'च्या युतीवर शिक्कामोर्तब
आरोपींवर गुन्हे दाखल-
मुलींवरील अत्याचाराची बातमी ईटीव्ही भारतने सर्वप्रथम दिली आहे. या बातमीच्या आधारे राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षांनी ( suo moto cognizance of Womens commission of Uttar Pradesh ) जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागविली आहे. मुलीवरील अत्याचाराची घटना ही लाजिरवाणी आणि निंदनीय असल्याचे म्हणत आयोगाने नाराजी व्यक्त केला आहे. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसरा हा अद्याप फरार आहे. पुरकाजी आणि भोपा अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस ठाणे परिसरातील खासगी शाळेच्या दोन व्यवस्थापकांवर लैंगिक अत्याचार, अमली पदार्थ खाऊ घालणे आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-Sharad Pawar Visits Suspended MPs : शरद पवार, जया बच्चन यांची खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट
अमली पदार्थ खाऊ घालून बलात्कार करण्याचा प्रयत्न -
बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दुसऱ्या ठिकाणी मुलींना नेण्यात आले होते. त्यांना रात्रभर त्याठिकाणी थांबावे लागले. यावेळी 17 मुलींना दोन व्यवस्थापंकानी अमली पदार्थ खाऊ घालून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर उत्तरप्रदेश हादरले आहे. मुलींच्या पालकांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मुलींची छेडछाडकरून नापास करण्याची दिली धमकी -
एका मुलीच्या पालकांनी रिपोर्टमध्ये सांगितले की, आरोपी व्यवस्थापक हे प्रात्यक्षिक परीक्षेच्या घेण्याच्या बहाण्याने घेऊन गेले होते. रात्री उशिर झाल्याचे सांगून त्यांना रात्री शाळेत थांबायचे सांगितले. दूर-दूर वरून आलेल्या मुलींच्या खिचडीत अमली पदार्थांचे मिश्रण करून त्यांना खाऊ घातले. त्यांना प्रकृती खराब होताच त्यांच्यासोबत छेडछाड करण्यास सुरूवात केली. त्यांना परीक्षात नापास करण्याची धमकीदेखील दिली. या भीतीने मुलींनी शाळेत जायचे बंद केले. सोमवारी भाजप आमदार प्रमोद उटवाल ( intervention of BJP MLA Pramod Utwal ) यांनी तक्रार केल्यानंतर पोलीस या प्रकरणात सक्रिय झाले. पोलिसांनी याप्रकरणात पाच टिम बनवून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा-Goa Cong MLA Ravi Naik resigns : रवी नाईक यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश