नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला विशेष मुलाखत ( PM Modi Interview ) दिली आहे. या विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या बाजूने लाट असून पाचही राज्यांच्या निवडणुका जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मोदींनी भाजपा, काँग्रेस आणि इतर अनेक ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केले. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत यूपी, गोवा, मणिपूर, पंजाब या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधानांची ही मुलाखत यूपीमधील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारापूर्वी आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. सर्व राज्यांतील जनता ही भाजपाकडे झुकत असल्याचे मी पाहत आहे. आम्ही पूर्ण बहुमताने निवडणुका जिंकू. या पाचही राज्यांतील जनता भाजपाला सेवेची संधी देतील, असे पंतप्रधान म्हणाले. सत्तेत आम्ही मोठ्या उर्जेने आणि मोठ्या प्रमाणावर 'सबका साथ, सबका विकास' या मंत्राने काम करतो, असे मोदी म्हणाले.
लखीमपूर खेरी हिंसाचार आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रावर मोदींनी भाष्य केले. लखीमपूर खेरी प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने समितीची स्थापना करायची होती. त्यास राज्य सरकारने संमती दिली आहे. राज्य सरकार पारदर्शकतेने काम करत आहे, असे मोदी म्हणाले.
पंजाबमध्ये आज भारतीय जनता पक्ष सर्वात विश्वासार्ह पक्ष म्हणून समोर आल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. समाजजीवनातील अनेक ज्येष्ठ, राजकारणातील बडे नेतेही आपला जुना पक्ष सोडून भाजपामध्ये दाखल झाले आहेत, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर जोरदार टीका केली. हा एक मोठा धोका आणि लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे. घराणेशाहीने राजकीय पक्षात येणार्या प्रतिभेला रोखण्याचे काम केले. जम्मू-काश्मीरमध्ये दोन राजकीय पक्षांनी अनेक दशकांपासून राजकारण केले. हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि तामिळनाडूच्या पक्षांमध्येही घराणेशाहीचे राजकारण सुरू आहे, असे मोदी म्हणाले.
देशाच्या विकासासाठी स्थानिक विविधतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे म्हणणारी भाजप एकटा पक्ष आहे. यापूर्वी परदेशी नेत्यांचे दौरे फक्त दिल्लीपर्यंतच होते. पण मी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना तामिळनाडूत, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना यू.पी. मध्ये तर जर्मनीच्या चान्सलरला कर्नाटकात नेले. देशाची शक्ती उंचावणे, प्रत्येक राज्याला प्रोत्साहन देणे हे आपले काम आहे. UN मध्ये, मी तमिळमध्ये बोलतो. जगाला अभिमान आहे की भारताकडे जगातील सर्वात जुनी भाषा आहे, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा -Maharashtra State Cabinet Meeting : भारतरत्न लता मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना मंत्रिमंडळ बैठकीत वाहिली श्रद्धांजली