लखनौ -सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकणे उत्तर प्रदेशातील नागरिकांना भलतेच महाग पडत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या एका वर्षात कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या नागरिकांकडून 250 कोटी रुपये वसूल केले आहेत. यात 47 लाख 30 हजार 312 रुपयांची वसूली रस्त्यांवर थुंकणाऱ्याकडून केली आहे. दंड भरवा लागत आहे. मात्र, लोक सुधारण्यास तयार नाहीत. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोरोना संक्रमित व्यक्ती थुंकली तरी संसर्ग पसरण्याचा धोका असतो.
उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई... उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात कोविड संबंधित आणि लॉकडाऊन उल्लंघन केल्यामुळे आतापर्यंत 55 लाख 73 हजार 783 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून 90 कोटी 42 लाख 76 हजार 304 रुपये जप्त करण्यात आले आहेत. कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी, रस्त्यावरच्या प्रत्येक व्यक्तीस मास्क घालणे अनिवार्य आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता, यूपी सरकारने दंडाची रक्कमही वाढविली आहे.
कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कारवाई वाहनधारकांकडून 171.16 कोटींची वसूल
यूपी पोलिसांनी वर्षभरात तीन कोटी 48 लाख 38 हजार 560 वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये 79 लाख 57 हजार 364 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहनधारकांकडून 171 कोटी 16 लाख 67 हजार 375 रुपये दंड आकारण्यात आला. इतकेच नाही तर भारतीय दंड कायद्याच्या कलम 188 अंतर्गत 2 लाख 54 हजार 797 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 4 लाख 324 जणांवर कारवाई झाली.
कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या नागरिकांकडून 250 कोटी रुपये वसूल तरतुदीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई
कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्व निर्बंध कडकपणे लादले गेले आहेत. जे तरतुदींचे उल्लंघन करतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असून दंड आकरण्यात येत आहे, असे एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने 1 सप्टेंबरपासून केंद्रीय मोटर वाहन दुरुस्ती कायदा 2019 लागू केला आहे. या प्रकरणात, परिवहन विभागाने 28 ऑगस्ट रोजी एक अधिसूचना देखील जारी केली.
या नियमांतर्गत -
नव्या नियमांनुसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आता वाहन चालकाला पूर्वीच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक दंड भरावा लागत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे वाहन चालवताना एखाद्या अल्पवयीन मुलाला पकडले गेले. तर 25 हजार रुपये दंड आणि वाहन मालकास 3 वर्षांपर्यंत शिक्षा होईल. तसेच त्या वाहनाची नोंदणीही रद्द केली जाईल. यापूर्वी अल्पवयीन मुलांचे वाहन चालविण्यास दंड आकारला जात नव्हता. त्याचप्रमाणे इमर्जन्सी वाहनाला मार्ग न दिल्याबद्दल आतापर्यंत कोणताही दंड आकारण्यात आला नव्हता. परंतु अशा वाहनाला मार्ग न दिल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागेल. हेल्मेट न घालता वाहन चालविण्यासाठी 500 रुपयांऐवजी 1000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच वाहन चालविण्याचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल.
हेही वाचा -गुजरात : ६ दिवस व्हेटिंलेटरवर राहून झुंज; ४ महिन्यांच्या बालकाची कोरोनावर मात