हरिद्वार (उत्तराखंड) -आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांचे शिष्य आनंद गिरी यांना अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी रात्री उशीरा हरिद्वार येथील आश्रमात जाऊन त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशी करून आनंद गिरी यांना अटक करण्यात आली आहे.
महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूप्रकरणी शिष्य आनंद गिरीला हरिद्वारमधून अटक
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांचे शिष्य आनंद गिरी यांना अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी रात्री उशीरा हरिद्वार येथील आश्रमात जाऊन त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशी करून आनंद गिरी यांना अटक करण्यात आली आहे.
शिष्य आनंद गिरी
काल सोमवारी महंत नरेंद्र गिरी यांनी प्रयागराज येथील बाघंबरी मठात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांना त्यांच्या खोलीतून सहा ते सात पानांची सुसाईड नोट सापडली. त्यात त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यासह दोघांनी त्रास दिल्याचा उल्लेख होता. त्यानुसार आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. तसेच नोटमध्ये उल्लेख असलेले मुख्य पुजारी आद्या तिवारी आणि त्यांच्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.