मधुबनी :Police raped: उत्तर प्रदेशातील मऊ येथील एका अल्पवयीन मुलीवर, मधुबनी जिल्ह्यातील (Madhubani Gang Rape Case) जयनगरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात जयनगर (JAINAGAR GANGRAPE CASE) पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांचा सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यासोबतच पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे.
यूपीच्या जयनगरमधील घटना : पोलिसांनी सांगितले की, सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असलेल्या इलेक्ट्रिशियन साजन कुमारला अटक करण्यात आली आहे. मधुबनी कोर्टातून त्याची कोठडी संपल्यानंतर, जयनगर पोलिसांनी त्याला यूपी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. युपी पोलीसांच्या चमुने पीडितेला जवाब नोंदवण्यास सोबत नेले आहे. मुलीने दिलेल्या जवाबानुसार, जयनगर पोलीस ठाण्यातील पोलीस चालक आचार्य आणि चौकीदार रामजीवन पासवान यांचा देखील सहभाग या प्रकरणात असल्याचे समोर आले आहे. दोघांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.