महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP office in Mumbai : उत्तर प्रदेश सरकार मुंबईत सुरू करणार कार्यालय, 'हा' आहे उद्देश

उत्तर प्रदेशचे मुंबईतील कार्यालय हे मूळ राज्याशी जोडण्याचा आणखी एक मार्ग ( Uttar Pradeshs Mumbai office ) खुला होणार आहे. या कार्यालयाचा उद्देश मुंबईत राहणाऱ्या यूपीच्या रहिवाशांना ( UP residents living in Mumbai ) त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्या हितांचे रक्षण करणे आणि त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील सर्व रहिवाशांशी संपर्क साधणे शक्य होणार आहे.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ

By

Published : May 9, 2022, 10:07 PM IST

लखनौ -उत्तर भारतीय आणि मराठी माणूस हा वाद निर्माण होत असल्याने उत्तर भारतीयांच्या सुरक्षेचा ( safety of North Indians in Mumbai ) प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उत्तर प्रदेशातील रहिवाशांसाठी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला ( Yogi Adityanath Mumbai office ) आहे.

उत्तर प्रदेशचे मुंबईतील कार्यालय हे मूळ राज्याशी जोडण्याचा आणखी एक मार्ग ( Uttar Pradeshs Mumbai office ) खुला होणार आहे. या कार्यालयाचा उद्देश मुंबईत राहणाऱ्या यूपीच्या रहिवाशांना ( UP residents living in Mumbai ) त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्या हितांचे रक्षण करणे आणि त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील सर्व रहिवाशांशी संपर्क साधणे शक्य होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी मुंबईत दीर्घकाळ ( UP citizens in Mumbai ) वास्तव्य करत आहेत किंवा दरवर्षी रोजगार शोधत आहेत, त्यांना या कार्यालयाचा फायदा होईल, असे सूत्राने सांगितले. तसेच संकटकाळात उत्तर प्रदेशमध्ये परत येण्यासाठीही फायदा होणार आहे.

उत्तर प्रदेशच्या रहिवाशांचे मुंबईत योगदान-अंदाजे मुंबईच्या 1 कोटी 84 लाख लोकसंख्येमध्ये उत्तर भारतीयांचे प्रमाणे सुमारे 50 ते 60 लाख आहे. यामध्ये यूपीमधून येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ते अनेक दिवसांपासून मुंबईत राहतात. वेळोवेळी उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांतील त्यांच्या घरी येतात. मुंबईत उद्योग, सेवा क्षेत्र, किरकोळ व्यापार, वाहतूक, खाद्यपदार्थ व्यवसाय, कारखाना किंवा गिरणी अशा अनेक क्षेत्रात उत्तर प्रदेशातील लोकांचे उल्लेखनीय योगदान आहे. मुंबईतील रहिवाशांच्या जीवनात अनेक क्षेत्रे मोठी भूमिका बजावितात. उद्योग आणि स्टार्टअपच्या क्षेत्रातही उत्तर प्रदेशातील रहिवाशांनी मुंबईत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माहिती तंत्रज्ञान, चित्रपट, दूरदर्शन, उत्पादन, वित्त, अन्न प्रक्रिया इत्यादी उद्योगांमध्ये यूपीच्या उद्योजकांचे मोठे योगदान आहे.

असंघटित क्षेत्रात युपीमधील कामगारांची संख्या मोठी- यूपीमधील कामगारही मोठ्या संख्येने असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. गेल्या दोन वर्षांत, कोविड आपत्ती आणि लॉकडाऊनमुळे, त्यापैकी मोठ्या संख्येने मुंबईतून त्यांच्या मूळ राज्यात उत्तर प्रदेशात परत यावे लागले. त्यावेळी योगी सरकारच्या एका मोठ्या योजनेंतर्गत त्यांना यूपीमध्ये सुखरूप आणण्याचा प्रयत्न केला. मुंबईमधील प्रस्तावित कार्यालयाच्या माध्यमातून मुंबईत राहणाऱ्या स्थलांतरितांना उत्तर प्रदेशातील पर्यटन, संस्कृती आणि इतर क्षेत्रात गुंतवणुकीची माहिती दिली जाईल. त्यांना येथे उद्योग सुरू करण्यास प्रवृत्त केले जाईल. यासोबतच त्यांच्याशी सल्लामसलत करून अनुकूल आणि व्यवसायासाठी आकर्षक वातावरण तयार करण्यात येणार आहे. यूपीमध्ये त्यांच्या उत्पादनांना किंवा सेवांना मोठी बाजारपेठ आणि मागणी आहे. त्यामुळे येथे गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, असेही सांगण्यात येणार आहे.

युपीमध्येच रोजगार देण्याचा प्रयत्न-प्रस्तावित कार्यालयाद्वारे इतर कामगारांसाठी, या फायद्यासाठी योजना तयार केल्या जाणार आहे. जेणेकरून कोणत्याही संकटाच्या वेळी त्यांना यूपीमध्ये येणे सोपे होईल. त्यांना त्यांच्या अनुभव आणि क्षमतेनुसार येथे काम किंवा रोजगार मिळू शकेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीही अशीच पावले उचलली जातील. जेणेकरून त्यांचे हित जपता येईल. यूपी सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे मुंबईत राहणाऱ्या लाखो यूपी रहिवाशांच्या हिताचे रक्षणच होईल, अशी उत्तर प्रदेश सरकारला अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details